पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४२)

बरोबर आहे अगर नाही हे त्यांचे त्यांनाच पहावयास सांगावें. पुष्कळ वेळां आपणांस असे आढळून येते की, मुले, फूट, यार्ड, मैल यांची कोष्टके बिनचूक सांगतात. परंतु त्यांना एक फूट लांबीची रेषा काढा म्हणून सांगितले असतां कांही येत नाही! ही खरोखरच शोचनीय स्थिति होय.
 चित्रकला, लेखन व वस्तुपाठ या विषयांनी जसें स्पर्शेद्रियास शिक्षण मिळतें तसेंच वाचन व गायन यांनी श्रवणेंद्रियांस शिक्षण मिळते. आईचे व भावंडाचे बोलणे ऐकून ऐकून लहान मुलांस बोलतां येऊ लागते. बोलण्याप्रमाणेच लेखन, गायन व वाचन याहि अनुकरणसाध्य कला आहेत. वाचन व गायन प्रथम मुलांकडून पुकळ वेळां ऐकवावें. असे केल्याने त्यांच्या श्रवणेंद्रियांवर चांगला ठसा उमटतो. हे सांगण्याचा उद्देश हाच की, ते विषय प्रथम श्रवणेद्रियद्वारेच शिकवावे.

गोषवारा.


 बोधः- संवेदनाच्या मागोमाग होणारा मनोव्यापार; संवेदन + विचार = बोध.
 बौद्धिक इंद्रिये:-कर्ण, त्वचा, नेत्र.
 स्पर्शेद्रियद्वारे होणारे ज्ञान:- आकार, दाब, वजन, अंतर वगैरे.
 श्रोत्रेंद्रीयद्वारे होणारे ज्ञान:- शब्दांच्याद्वारे होणारे सर्व ज्ञान.
 नेत्रद्वारे होणारे ज्ञान:- अंधार, उजेड, रंग, आकार, अंतर वगैरे.
 इंद्रियांचा विकासक्रमः- स्पर्शेद्रिय अगदी प्रथम, मग नेत्र नंतर रसना, व शेवटी घ्राण.
 इंद्रियशिक्षणः- हे सर्व शिक्षणाचा पाया; ह्यांत निरीक्षण शक्तीचा विशेष विकास होतो.
 इंद्रियशिक्षण व त्या संबंधी शिक्षकांचे कर्तव्यः-

 (१) वस्तुसांनिध्य अवश्य पाहिजे; नुसत्या शब्दांनी काही फायदा व्हावयाचा नाही.