पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३८)

वस्तुपाठ वगैरे विषयांकडे जे विशेष लक्ष दिले जात आहे त्याचें कारण तरी हेच. असो; याविषयी आपणांस पुढे सविस्तर विचार कर्तव्य आहेच.
 इंद्रियशिक्षण हा शब्द पूर्वी पुष्कळवेळां आलेला आहे व या शब्दाचा अर्थहि त्याच्या स्वरूपावरून समजण्यासारखा आहे. तथापि येथे थोडेसे जास्त स्पष्टीकरण करणे अवश्य आहे. इंद्रियाशिक्षण या शब्दाचा अर्थ इंद्रियांकडून योग्य व्यवस्थेशीरपणे काम करून घेणे व तेणेकरून त्यांचा पूर्ण विकास करणे. असे करण्यांत उद्देश हाच की, इंद्रियद्वारे होणारे ज्ञान, निर्णय, अनुमान वगैरे उच्च मनोव्यापारीस उपयोगी पडावें; व हे मनोव्यापार व्यवस्थेशीर करितां येणे हाच बौद्धिक शिक्षणाचा अंतिम हेतु आहे.
 इंद्रियशिक्षण देण्यांत मुलांच्या निरीक्षणशक्तीचा योग्य तऱ्हेनें विकास करणे हा मुख्य उद्देश. हा उद्देश ज्या उपायांनी साध्य होईल त्या उपायांचाच आपणांस उपयोग केला पाहिजे.
 शिक्षकाने नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या. पहिली गोष्ट-इंद्रियांत एक प्रकारचा तरतरीतपणा आणणे ही होय. थोड्याशा निरनिराळ्या परंतु एकमेकांशी बरेच साम्य असलेल्या वस्तूंमधील भेद दाखविल्याने ही गोष्ट साध्य होते. दुसरी गोष्ट मुलांना पदार्थांचे पूर्ण निरीक्षण करावयास शिकविणे ही होय. मुलांच्या पुढे भिन्न भिन्न वस्तु ठेवाव्या व त्यांमधील भेद त्यांना ओळखून लावावे. असे केल्याने त्यांची इंद्रिये तीक्ष्ण व तरतरीत बनतात. प्रथम मुलांना ज्या वस्तूंमधील भेद सहज समजेल अशाच वस्तु दाखवाव्या-काळा व पांढरा रंग, हिरवा व पिवळा रंग, मऊ व कठीण पदार्थ, इत्यादि. नंतर हळू हळू ज्या वस्तूंमध्ये बरेच साम्य असेल अशा वस्तु दाखवाव्या व त्यांमधील भेद मुलांचे नीट लक्षात आणून द्यावा. तात्पर्य, प्रथम जे अगदी सोपे असेल तें सांगावे व नंतर हळू हळू जे अवघड असेल त्याकडे मुलांचे मन वळवावें. भिन्न भिन्न पदार्थ मुलांच्या नजरेसमोर आणावे असे जरी