पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३७)

ओळखू लागते. परंतु या इंद्रियांचा विकास बराच आस्ते आस्तेहोत जातो. आता आपण इंद्रियशिक्षणाकडे वळू.
 बाह्यजगाविषयी आपणांस में ज्ञान होतें तें मुख्यतः इंद्रियद्वारेंहोते असें पूर्वी एकदोन वेळां सांगितले आहेच. उच्च मानसिक व्यापारांस लागणारी सर्व सामुग्री आपणांस इंद्रियेच देतात. सामुग्री ज्या त-हेची असेल त्या त-हेचा माल मन तीपासून तयार करील इंद्रियद्वारे मिळणारे ज्ञान जर अपुरे असेल अगर कच्चे असेल तर आपले उच्च मनोव्यापारहि तशाच प्रकारचे होणार. सबब प्रत्येक शिक्षकाने मुलांच्या इंद्रियाशिक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. लहानपणी म्हणजे मुलें पांचसात वर्षांची होईतोपर्यंत त्यांची इंद्रियें बुद्धीपेक्षा जास्त तीक्ष्ण असतात; व विशेषेकरून नेत्र व कर्ण फारच तीक्ष्ण असतात; व या इंद्रियांचाच विकास प्रथम होतो. सबब अशावेळी जे शिक्षण द्यावयाचें तें नेत्र व कर्ण यांनाच द्यावें. त्यांतल्यात्यांत नेत्रांस अधिक द्यावे. शिक्षण देतांना शिक्षकानें मुख्य ध्यानात ठेवण्याची गोष्ट, मुलांना हात, पाय, डोळे या इंद्रियांचा योग्य उपयोग कसा करावा हे शिकविणे, ही होय. ज्या मुलांना लहानपणी नीट निरीक्षण करावयास शिकविलेले असते त्यांच्या अंगी मोठेपणी सृष्टि-सौंदर्य पाहाण्याची व त्यांतील खुबी जाणण्याची एक प्रकारची शक्ति येते. तसेच ज्या मुलाच्या श्रोत्रेंद्रीयास लहानपणीच योग्य वळण मिळालेले असते तें मूल एखादा उत्तम गवई होण्याचा विशेष संभव असतो. अशा मुलास काव्यामृतरसपानांत जी एक प्रकारची गोडी लागते ती इतरांस लागत नाही. तसेच ज्या मुलाचे हातांत लहानपणीच शिक्षणाने एक प्रकारची स्थिरता व चपळाई आणिलेली असते तें मूल मोठेपणी उत्तम चितारी निपजू शकेल. ताप्तर्य,-इंद्रियशिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया होय. पाया जर भक्कम नसेल तर त्यावर होणारी इमारत डळमळीत राहाणार. तद्वत् इंद्रियशिक्षण जर योग्य त-हेने झाले नाही तर पुढील सर्व शिक्षण लटपटीतच होणार.हे तत्त्व अलीकडे कळू लागले आहे. प्राथमिक शाळांतून बालोद्यान, ४