पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३६)

दूर एकीकडे नेऊन जर ठेविलें तर आपणांस असा अनुभव येईल की, चिताऱ्याच्या मुलाचे नेत्र अगर भिल्लाच्या मुलाचे श्रोत्रंद्रिय या दोहोंचाहि फारसा विकास होणार नाही परिस्थिति अनुकूल पाहिजेच. यावरून असे सिद्ध होते की, इंद्रियविकासहि वर लिहिलेल्या दोन गोष्टींनी ठरविला जातो,म्हणजे नैसर्गिक कल व परिस्थिति यांचे मानाने इंद्रियविकास कमी जास्त होतो. बऱ्याचशा मुलांचा इद्रियविकासक्रम पाहू अस आढळून आले आहे की, मुलांची इंद्रिये पुढे दिलेल्या क्रमाने बहुधा विकास पावतात.
 (१) स्पर्शेद्रिय, (२) नेत्र, ( ३ ) श्रोत्रेंद्रीय, ( ४ ) रसना आणि (५) घ्राण. याचा अर्थ इतकाच की, सर्व इंद्रियांचा एकेच काळी जरी विकास चालू असतो तरी विवक्षित काळी विवक्षित इंद्रियांचा विकास विशेष जोराने होत असतो. कोणी असे समजू नये की, पहिली काही वर्षे अगर महिने फक्त स्पर्शद्रियाचाच व्यापार अगर विकास चालू असतो, व त्यानंतर नेत्राचे विकासास आरंभ होतो. जन्मल्यानंतर एक दोन आठवडेपर्यंत मुलाच्या इंद्रियांचें जर आपण नीट निरीक्षण कलें तर आपणांस असे आढळून येईल की, स्पर्शेद्रियाचा विकास या कालांत फारच जोराने होत असतो. नेत्राचा विकास सावकाश होत जातो. पहिल्या आठदहा दिवसांत तर काहीकाही मुलें पुरते डोळेहि उघडीत नाहीत. याच्या उलट असाहि अनुभव आहे की काहीकाही मुलें उपजतांच दिव्याकडे पाहात स्वस्थ पडतात. इतर प्राण्यांतहि आपण असेंच पाहातो.मांजरीच्या पिलांचे डोळे एकदोन दिवस मिटलेले असतात. तसेच कुत्रीच्या पिलांचे डोळे नऊ दिवस मिटलेले असतात. मुलांना प्रथम अंधार व उजेड यांमधील भेद समजू लागतो, व नंतर हळू हळू निरनिराळ्या वस्तूंमधील भेद समजू लागतो. श्रोत्रेंद्रीय याच त-हेनें विकास पावते. मुलांस अगोदर ध्वनि व त्याचा अभाव यांतील भेद समजू लागतो. नंतर काही कालाने मूल आपल्या आईचा आवाज ओळखू लागते. नंतर इतर ओळखीच्या माणसांचा व प्राण्यांचा ( मांजर, कावळा, कुत्रे, गाय वगैरेचा ) आवाज