पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४)

कल्पना प्रथम मुलांना येते, ती दोन हातांवर पडणाऱ्या पदार्थांच्या दाबामुळेच येते. मुले पदार्थ हातांत घेतात, त्यावरून हात फिरवितात, एका हातांत घेऊन पाहातात, फिरून दोन्ही हातांनी तेच पदार्थ खाली वर उचलून पाहतात, हे आपण पुष्कळ वेळां पाहिले असेलच. शिक्षणदृष्ट्या हे इंद्रिय फार महत्त्वाचे आहे. इतर इंद्रियांना-विशेषेकरून नेत्रांनातरी या इंद्रियाची विशेष गरज लागते.
 श्रोत्रेद्रिय व त्याचे महत्त्वः- ज्ञानेंद्रिय या नात्याने हेहि इंद्रिय फार महत्त्वाचे आहे. पुष्कळ पदार्थाचे ज्ञान आपणांस ध्वनीच्या मदतीने होते. भाषेच्या द्वारे होणारे ज्ञान म्हणजे ध्वनीच्या मदतीने मिळणारे ज्ञान. पुष्कळ पदार्थ यांच्या आवाजावरून ओळखितां येतात.
 नेत्र व त्यांचे महत्त्वः-- या इंद्रियाचे साहाय्याने आपणांस अंधार, उजेड, रंग वगैरेचे ज्ञान होते. पदार्थाचे अंतरहि आपणांस या इंद्रियद्वारे समजतें. जवळचा पदार्थ पाहण्यांत व दूरचा पदार्थ पाहण्यांत डोळ्यांवर बसणारा ताण कमीजास्त असतो. शिवाय पदार्थांच्या दृश्यमान आकारांवरूनहि त्यांचे अंतर आपणांस ताडितां येते. पदार्थांच्या भरीवपणाचे व आकारांचे ज्ञानहि आपणांस हे इंद्रिय देते. परंतु या कामी आपणांस स्पर्शद्रियाची मदत आरंभी तरी घ्यावीच लागते. स्पर्शद्रियाची मदत जर नसेल तर रंगशिवायकरून या इंद्रियद्वारे होणारे इतर ज्ञान कच्चे व अविश्वसनीय असते.
 नुसत्या डोळ्यांच्या साहाय्याने आपणांस पदार्थांच्या भरीवपणाचे बरोबर ज्ञान होत नाही. नाटकांतील पडद्यांवर काढलेली टेकड्यांची व झाडांची चित्रे भरीव आहेत असे आपणांस वाटते परंतु वस्तुस्थिति तशी नसते हे त्या पडद्यांस हात लाविल्याने समजतें.
 एथपर्यंत बोध म्हणजे काय व कोणत्या इंद्रियद्वारे कोणतें ज्ञान होते हे सांगितले. संवेदन झाल्यापासून बोध होईपर्यंत जो मनोव्यापार होतो त्याचे दोन मुख्य विभाग करितां येतीलः-- (१) संवेदनाचे पूर्ण ज्ञान व त्या (२) संवेदनाचा इतर संवेदनांशी मेळ व या सर्व ज्ञानाचे एकीकरण अथवा पदार्थज्ञान; आपणांस जेव्हां