पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३)

 ( ३ ) या वस्तूच्या ठिकाणी उष्णता म्हणून जो कांहीं आपणांस पूर्वी कधीतरी अनुभव आला असेल, तो धर्म असावा;
 ( ४ ) जी दुःखकर विकृति झाली ती विस्तवाचे कार्यापासून झाली.
 आपल्या शरिराचे कातडींतील आंतल्या बाजूस कांहीं उच्च लहान लहान, टेंगुळाप्रमाणे वर आल्यासारखा भाग आहे. या भागांत ज्ञानतंतु पसरलेले आहेत; व हे ज्ञानतंतु मेंदूस जोडलेले आहेत. पदार्थांचे स्पर्शज्ञान आपणांस होते ते ज्ञानतंतूवर पदार्थाचा दाब पडतो म्हणून होते. हा दाब कित्येक वेळी फारच थोडा असतो. स्पशेंद्रियाच्या साहाय्याने पदार्थांचा आकार, पृष्ठभाग, उष्णमान, व स्नायूंचे व स्पर्शद्रियाचे मदतीने पदाथाच वजनहि आपणांस समजते. या इंद्रियद्वारे मिळणारे ज्ञान शिक्षणदृष्टया फार महत्त्वाचे असते. असो. वर लिहिलेल्या उदाहरणांवरून बोध म्हणून जो व्यापार आहे त्याचे स्वरूप ध्यानांत आले असेलच; तथापि खाली दिलेल्या समीकरणावरून हे जास्त स्पष्ट होईल.
 संवेदन ( सुखजज्ञक अगर दुःखजनक ) + विचार = बोध. संवेदनाचा एखाद्या विवक्षित पदार्थाशी संबंध जोडणे ( म्हणजे जी विकृति होते ती अमुक एका पदार्थापासूनच होते हे समजणे) या क्रियेस बोध असे म्हणावे. कर्ण, त्वचा, व नेत्र या इंद्रियांना बौद्धिक इंद्रियें हे नांव मानसशास्त्रज्ञांनी दिले आहे. कारण यांचा बौद्धिक व्यापारांशीं विशेष संबंध येतो. या इंद्रियांचे साहाय्याने आपणांस बाह्यजगाचे ज्ञान कसे होते ते मागे सांगितले आहेच. आतां यांपैकी कोणते इंद्रिय काय काय माहिती करून देते ते सांगितले पाहिजे.
 स्पर्शेंद्रीये व त्याचे महत्त्वः--नुसत्या स्पर्शद्रियद्वारें अगर स्पशेंद्रिय व स्नायु यांच्याद्वारे पदार्थाचा आकार, पृष्ठभाग, दाब, वजन, मऊपणा, खरबरीतपणा, कठीणपणा, इतकेच नव्हे तर पदार्थाचे अंतर व भरीवपणा हीसुद्धा आपणांस समजतात.
 लहान मुलांस प्रथम पदार्थांचे अंतर समजू लागते ते हातपाय जवळ लांब केल्यामुळेच समजू लागते. पदार्थांच्या भरीवपणाची