पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३२)

(१) आपणांस दिसते,
(२) कांहीतरी दिसते,
(३) कांहीतरी वाटोळे दिसते,
(४) जे कांहीं दिसतें तें पूर्वानुभवावरून चेंडूच आहे असे ठरते.
 दुसरे उदाहरणः--आपणांस शाळेची घंटा ऐकू येते.
 या उदाहरणांतील पाहिला व्यापार ‘ऐकू येते' हा होय. दुसरा व्यापार- कांहीतरी ऐकू येते, ‘ तिसरा- घंटानाद ऐकू येतो, व नंतरचा व्यापार- शाळेची घंटा ऐकू येते ' हा होय.
 मागील उदाहरणांत ध्वनीचे ज्ञान होण्यास हवेची जरूर असते असे सांगितले आहेच. आपण एखादें भांडे वाजविले म्हणजे त्या भांड्याचे अणु कंप पावू लागतात. त्यामुळे भांड्याच्या आसपासच्या हवेस धक्का बसतो. पाण्यांत जर आपण एखादा दगड टाकिला तर त्याच्या आघातामुळे पाण्यावर लाटा दिसू लागतात; तशीच हवेची स्थिति होते. हवेस धक्का बसला की, त्यामुळे धक्का बसलेल्या ठिकाणापासून हवेत लहान मोठ्या लाटा उत्पन्न होतात. या लाटा जात जात आपले कानांपर्यंत जाऊन कानांतील ज्ञानतंतूंवर आदळतात व म्हणूनच आपणांस ध्वनीचे ज्ञान होते. नेत्रद्वारे ज्ञान होण्यास ज्या त-हेचे सूक्ष्म मनोव्यापार व्हावे लागतात, तशाचसारखे व्यापार कर्णद्वारे ध्वनीचे स्पष्ट ज्ञान होण्यास व्हावे लागतात, हे यावरून ध्यानात येईल; असो.
 आतां आपण स्पर्शद्रियद्वारे ज्ञान कसे होते ते पाहू. समजा की 'आपला हात विस्तवाने भाजला' इतके ज्ञान मनास झाले. हा जो कांहीं व्यापार झाला त्याचे आपण जर पृथक्करण केले तर त्यांत तीनचार सूक्ष्म व्यापार आहेत, असे आपल्या दृष्टोत्पत्तीस येईल.
हे चार व्यापार एणेप्रमाणेः--
 ( १ ) कांहीतरी विकृति झाली व ती दुःखद झाली ( संवेदन );
 ( २ ) ती हातास झाली, व ती काहीतरी बाह्यवस्तू मुळे झाली;