पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०)

फारसा उपयोग होत नाही, त्याचप्रमाणे जिव्हेचाहि होत नाही. तथापि शिक्षणाने हे इंद्रिय बरेच तीक्ष्ण करितां येते असा अनुभव आहे.
 रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, वस्तुपाठ वगैरे विषय शिकवितांना या इंद्रियास थोडेबहुत शिक्षण देतां येते हे खरे. तथापि कित्येक पदार्थांचा वास घेणे जितकें धोक्याचे असते तितकेंच किंबहुना थोडेबहुत जास्त त्यांची चव पाहाणे धोक्याचे असते, सबब हेहि इंद्रिय शिक्षणदृष्ट्या फारसे महत्त्वाचे नाही.
 घ्राण व रसना ही इंद्रिये आपले शरिरास काय पथ्यकर, काय अपायकारक हे सांगतात, सवव यांस शरिराचे संरक्षक म्हणण्यास हरकत नाही. असो. आतां आपण इतर इंद्रियांकडे वळू. या इंद्रियांचे व त्यांच्या व्यापारांचे वर्णन देण्यापूर्वी बोध म्हणजे काय त्याचा थोडा सविस्तर विचार करूं. कारण उच्च मनोव्यापारांचा, बोध हा पाया होय.

गोषवारा.

 संवेदनः- हा अगदी प्रथम होणारा मनोव्यापार; हा ज्ञानेंद्रियांस विकृति होतांच होतो.

 संवदनांचे प्रकार. (१) सामान्य-उ. भूक, तहान, थकवा.

    (२) विशिष्ट-उ. ज्ञानेंद्रियांच्या द्वारे होणारी.

 घ्राणेंद्रियः- शिक्षणदृष्टया ह्याचे महत्त्व अगदीच कमी; रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र ह्या विषयांत, ह्या इंद्रियास थोडें बहुत शिक्षण मिळतें.

 रसना:-- ह्याची स्थिति घ्राणेद्रियाप्रमाणेच.
घ्राण व रसना ही इंद्रिये शरिराचेच नोकर आहेत असे दिसते.

भाग सहावा.
-::-
बोध आणि कर्ण, त्वचा व नेत्र यांविषयी.

 बोध ह्मणजे संवेदनाचे मागोमाग होणारा मनोव्यापार हे मा-