पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२९)

 घ्राणेंद्रियः--या इंद्रियाचे साहाय्याने पदार्थांचा वास सम- जतो. घ्राणेंद्रियांतून फुप्फुसांत जी हवा जात असते तीत काही फरक झाल्यास तो ताबडतोब या इंद्रियामुळे समजतो. नाकाचे आंतील बाजूस मऊ व ओली त्वचा आहे. या त्वचेंत ज्ञानतंतु पसरलेले आहेत. त्यांवर काहीएक विवक्षित प्रकारचे कार्य झा- ल्यास ते कंप पावू लागतात. यानंतर वास येणे हा मनोव्यापार होतो. ज्या पदार्थाचा आपणांस वास येतो त्यांचे ज्ञानतंतूवर को- णत्या प्रकारचे कार्य होते ते अद्याप पावेतों पक्के समजलेले नाही. मनुष्यापेक्षां पशूचे घ्राणेंद्रिय आधिक तीक्ष्ण असते. अर्ध मैल अं- तरावर जरी भक्ष्य असले तरी ते सिंहास घ्राणेंद्रियाचे मदतीने समजतें असें म्हणतात. घ्राणेंद्रियाचे द्वारें जी संवेदने होतात ती क्षणिक असतात. त्यांचे योगे होणारे ज्ञान अनियामक असते. अशी जरी स्थिति आहे तरी शिक्षणाचे योगे घ्राणेंद्रिय बरेंच तीक्ष्ण क- रितां येते, असा अनुभव आला आहे. गंधी लोकांना नुसत्या वा- सावरून निरनिराळी सुवासिक तैले व त्यांचे भाव कसे चटदिशी ओळखितां येतात! मानसिक शिक्षणांत या इंद्रियाचा फारसा उ. पयोग होत नाही. वनस्पतिशास्त्र अगर रसायनशास्त्र यांसारखे विषय शिकवितांना या इंद्रियास थोडेबहुत शिक्षण मिळते. काही काही वनस्पति व पदार्थ नुसत्या वासावरून ओळखितां येतात. तथापि कित्येक पदार्थाचा वास घेणे सुद्धा पुष्कळ वेळां धोक्याचे असत. सबब शिक्षणदृष्टया या इंद्रियाचे फारसे महत्त्व नाही.
 रसना ( जिव्हा ):-या इंद्रियाचे मदतीने आपणांस पदार्थांची चव समजते. आपल्या जिभेचे पृष्ठभागाखाली सूक्ष्मज्ञानतंतु आहेत व हे मेंदूस जोडलेले असतात. जिभेचे टोंक, कडा व खालचा भाग विशेष तीक्ष्ण असतात. पदार्थांचे काहीतरी रासायनिक कार्य होऊन जिभेच्या ज्ञानतंतूंना एक प्रकारची गति मिळते. व याच कारणामुळे आपणांस पदार्थाची चव समजत असावी असा शास्त्र- ज्ञांचा समज आहे. वस्तुस्थिति खरोखर काय आहे हे अद्याप खा- त्रीपूर्वक समजलेले नाही. घ्राणेंद्रियाचा ज्याप्रमाणे शिक्षणाचे कामी