पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

 (७) कोणताहि विषय शिकवितांना मधून मधून प्रश्न करावे.
 (८) शिक्षा, बक्षिसें वगैरे साधनांचा योग्य उपयोग करावा.

भाग पांचवा.
-::-
संवेदन;-ज्ञानेंद्रिये;-घ्राणेंद्रिय व रसना.

 पूर्वी सांगितले आहेच की, आपणांस बाह्यवस्तूंविषयी जें कांही ज्ञान होतें तें मुख्यत्वेकरून घ्राणेंद्रिय, रसना, त्वचा, कर्ण व नेत्र या पांच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे होते. आपण ज्यास मन म्हणतो, त्याचे ही पांच ज्ञानोंद्रिये नोकर आहेत. त्याने काम सांगावें व या आज्ञाधारक सेवकांनी ते लागलेच करावे, अशांतला सर्व प्रकार आहे. अथवा आपण मनरूपी किल्ल्यास या पांच वाटा आहेत असे समजू. यांपैकी कोणत्यातरी एका वाटेनेंच किल्लयांत प्रवेश व्हावयाचा. असो; आतां आपण या पांच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपणांस कसे ज्ञान होतें तें पाहू. या पांच ज्ञानेंद्रियांपैकी घ्राणेंद्रिय व रसना यांचा मनाशी फारसा संबंध नाही. ही इंद्रियें शरिराचेच नोकर आहेत, असे म्हटल्यास हरकत नाही. तथापि मनाशीहि ज्या अर्थी यांचा थोडाबहुततरी संबंध येतो व यांच्या मदतीने हलक्या तऱ्हेचे का होईना, आपणास काहीतरी ज्ञान मिळते, त्या अर्थी या भागांत त्यांविषयी थोडासा विचार करण्याचे योजिले आहे.
 काहीतरी वाचण्यांत अगर लिहिण्यांत आपण अगदी निमग्न झालो असतां कांहीतरी गोड वास आला असे समजूं. आता 'वास आला' म्हणजे झाले काय हे आपण पाहूं. आपल्या घ्राणेंद्रियास काहीतरी विकृति झाली, हे आपल्या मनास समजले. हा जो व्यापार झाला त्यास संवेदन हे नांव मानसशास्त्रज्ञ देतात.'वास आला' हा व्यापार दिसण्यात कितीतरी साधा दिसतो. परंतु खरोखर हा व्यापार थोडा गहन आहे. यात काही शारीरिक व्या-