पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३)

बक्षिसाच्या आशेने कितीतरी मुले शिक्षक काय सांगतात त्याकडे विशेष लक्ष देतात !
 अवधानाचे मार्गात मुखत्वेकरून दोन प्रकारचे अडथळे येतात. काही अंतस्थ व कांहीं बाह्य. अशक्तता, वाईट हवा, शाळेचे आसपास गलबला हे बाह्य अडथळे होत. बुद्धिमांद्य, उद्वेग, मनाची चंचलता, हे मानसिक अगर अंतस्थ अडथळे होत. शिक्षक व शिष्यवर्ग यांचेमध्ये परस्परांविषयी सहानुभूति असली म्हणजे शिकत असतांना मुलांचे लक्ष शिक्षक काय सांगतात त्याकडे साहजिकच लागते. याकरितां प्रत्येक शिक्षकाने मुलांची सहानुभूति मिळविण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
 शिक्षक कितीहि उत्तम असला तरी तो में शिकवीत असेल त्याकडे मुलांचे जर लक्ष नसेल तर त्याच्या शिकविण्यापासून त्याला स्वताला अगर मुलांना कोणालाच काहीएक फायदा होणार नाही. कोणत्याना कोणत्या तरी साधनाने शिक्षकाने मुलांचे मन आकर्पण करून घेतलेच पाहिजे. हल्ली प्राथमिक शाळांत मुलें बहुधा सहाव्या सातव्या वर्षी येऊ लागतात. व ती फार झाले तर बाराव्या वर्षांपर्यंत या शाळांत राहतात. मुले शाळेत येऊ लागतात त्या वयांत त्यांच्या अंगी प्रवर्तकशक्तींचा ( इच्छाशक्तीचा ) जवळजवळ अभावच असतो. त्यांची बुद्धि अगदी बीजरूप स्थितीत असते. त्यांना आपले हिताहित समजत नसते. म्हणूनच शिक्षक काय सांगतो त्याकडे मुले आपण होऊन फारसे लक्ष देत नाहीत. अशा स्थितीत शिक्षकाने अनैच्छिक अवधानाचीच मदत मिळविली पाहिजे. शाबासकी, बक्षिसें, मार्क या उपायांनी मुलांचे लक्ष आकर्षण करून घेतले पाहिजे. मुलांच्या अवधानाच्या मार्गात येणाऱ्या गोष्टी दूर केल्या पाहिजेत. कोणताहि धडा लांबलचक असतो कामा नये. एकच विषय फार झाले तर ३०|३५ मिनिटें शिकवावा. तसेंच जो विषय शिकवावयाचा असेल तो मुलांचे आटोक्याबाहेरचा नसावा. एक विषय शिकवून झाला की, लगेच दुसरा विषय शिकविण्यास आरंभ करूं नये. मध्यंतरी थोडीतरी