पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)

असतात. परंतु त्यांस चालता बोलता येऊ लागले की, परावलंबन कमी होत जाते.
 दुसऱ्या कालांत म्हणजे सातवें वर्ष संपता संपता मुलांचे पहिले दांत पडू लागतात; हाच काय तो त्यांचे शरिरांत फेरबदल होतो.
 तिसरा काल संपण्याचे सुमारास मुले वाढीस लागतात. याच कालांत नवे दांताहि येतात, व चेहरा जून दिसू लागतो.
 चवथा कालअखेर मुलांस अक्कलदाढा येतात. व त्यांचे चेहऱ्यातहि बराच फरक दिसू लागतो.
 वर मनोविकास कस कसा होत जातो ते सांगितले. आतां मानसिकशक्तींचा विकासक्रम सांगतो. प्रथमारंभ बाह्यवस्तूंमुळे ज्ञानेंद्रियांना विकृति होते. नंतर त्या वस्तूंविषयी कांहीतरी बोध अगर ज्ञान होते. याचा ठसा मनांत राहतो, हा धारणाशक्तीमुळे राहतो. नंतर कांहीं काळ लोटल्यावर प्रसंगानुसार त्या वस्तूंची आठवण होते; ही स्मरणशक्तीमुळे होते. स्मरणशक्तीच्याच साहाय्याने कल्पनाशक्ति आपले काम करू लागते; व विचार, अनुमान, निर्णय, वगैरे उच्च बौद्धिक व्यापार नंतर हळू हळू होऊ लागतात.
या वर सांगितलेल्या कोणत्याहि बौद्धिक व्यापारास अवधानाची अवश्यकता असते. सवय अवधानशक्तीचा प्रथम विचार करून नंतर इतर मानसिकशक्तींचा क्रमाक्रमाने विचार करूं.

गोषवारा.

 मनाची वाढः— मानसिक सामुग्रीत भरती.
 मनाचा विकासः– मानसिक सामुग्रीची रूपांतरे होणे.
 ज्ञानेंद्रियांचे कामः- मानसिक सामुग्री पुरविणे; सबब त्यांना योग्य वळण पाहिजे.
 मानसिक विकास दोन गोष्टींनी ठरविला जातोः
  ( १ ) मनाची स्वाभाविक प्रवृत्ति व ( २ ) परिस्थिति;
 परिस्थितीचे विशेष महत्त्व.
 मनोविकासाचे काल:-