पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

यांशी, काहींचा नेत्रांशी व कांहींचा फुप्फुस, हृदय व प्लीहा यांशी संबंध आहे.
 वर लिहिलेल्या वर्णनावरून आपणांस असें स्पष्ट दिसून येईल की, मोठा मेंदू हा ज्ञान, विचार, सुखदुःखादि भावना, यांचे स्थान आहे.
 मानसिक शक्ति व मेंदूचा आकार व वजन ह्यांमध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारचा संबंध असावा असे दिसते. सुशिक्षितांचा मेंदू बराच मोठा असतो. नीग्रो, भिल्ल वगैरे रानटी जातीचे लोकांचा मेंदू बराच लहान असतो व माकडांचा मेंदू तर फारच लहान असतो असे शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.
 मोठ्या मेंदूस जर काही इजा झाली तर विचार, सुखदुःखादि भावना, इच्छा, हे व्यापार सुयांत्रितपणे चालत नाहीत; सर्व घोटाळा होतो व मनुष्य वेडा होतो.
 लहान मेंदू मोट्या मेंदूचा चाकर आहे असे समजल्यास हरकत नाही. या मेंदूचा जरी चलनवलनाच्या स्नायूंवर अंमल असतो तरी मोठ्या मेंदूस विचारल्याशिवाय अगर त्याचा हुकूम झाल्याशिवाय या लहान मेंदूस कांहींच अंमल गाजविता येत नाही.

मज्जारज्जु.

 याचे वर्णन वर दिलेच आहे. बाह्यवस्तूंचा सूक्ष्मज्ञानतंतूंवर कांहींएक विशिष्ट प्रकारचा आघात होतो. त्यायोगे हे ज्ञानतंतू कंप पावू लागतात; व हा कंप ज्ञानतंतूंच्या एका अणूपासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे, जात जात मोठ्या मेंदूपर्यंत जातो. मज्जारज्जूचे मुख्य काम जी बातमी मिळेल ती पुढे रवाना करावयाची हे होय. मज्जारज्जु मोठ्या मेंदूचा जरी नोकर आहे, तरी तो काही कामें आपले यजमानास विचारल्याशिवाय करूं शकतो. उदाहरणार्थः- :-आपण झोपेत खोकतों, शिंकतों, पाय हालवितों, लोळतो; परंतु या क्रियांची बातमी मेंदूस मिळत नाही.
 मोठा मेंदू , मज्जारज्जु, मज्जारज्जूच्या डाव्या व उजव्या