पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)

धाग्यासारखे फांटे फुटलेले असतात व ते सर्व शरीरभर जाळ्याप्रमाणे पसरलेले आहेत. शरिराच्या काही विवक्षित भागांवर हे ज्ञानतंतू बरेचसे असतात. काहींवर अगदी कमी असतात. मज्जारज्जूचा अगदी वरचा भाग झणजे मानेजवळील भाग फारच नाजूक असतो. फुप्फुस, हृदय, जिव्हा, नेत्र, कर्ण वगैरेच्या स्नायूंशी याचा अगदी निकट संबंध असतो. यास जर धक्का बसला तर तात्काल मृत्यु येतो. फाशी देण्यांत याच तत्त्वाचा उपयोग केलेला आहे.
 मेंदू व मज्जारज्जु या सारखाच आणखी एक भाग मज्जारज्जूच्या डाव्या व उजव्या बाजूस आहे. याचा संबंध अन्नपचन, रुधिराभिसरण, श्वासोच्छ्वास, यांशी विशेष असतो. मानसिक व्यापारांशी याचा फारसा संबंध नसल्यामुळे याविषयी येथे विचार करण्याचे प्रयोजन नाही.
 ज्ञानतंतू सर्व शरीरभर पसरलेले आहेत असें वर सांगितले आहेच, नुसत्या डोळ्याने आपण जर एखादा ज्ञानतंतु पाहिला तर तो एक बारीकशी पांढरी दोरी असावी असें आपणांस वाटते. परंतु तोच जर सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेऊन पाहिला तर तो पुष्कळ लहान लहान सूक्ष्मतंतूंचा बनविलेला आहे असे आपणांस दिसेल. हे बारीक सूक्ष्मतंतू दोन प्रकारचे असतात. कांही मेंदूकडे जाणारे व काही याच्या उलट दिशेने जाणारे. पहिल्या सूक्ष्मतंतच्या द्वारें मेंदूकडे बातमी जाते. नंतर त्या ठिकाणी याबद्दल नीट विचार होतो व विचाराअंती मेंदूकडून स्नायूंकडे काही निरोप जातो. तो दुसऱ्या प्रकारच्या सूक्ष्मज्ञानतंतूंचे द्वारे जातो. मेंदूत व मज्जारज्जूत नुसते ज्ञानतंतूच नसतात. ज्ञानतंतूशिवाय काही एका विवक्षित द्रवरूप पदार्थाने भरलेल्या पेशाहि आढळतात. यांस आपण ज्ञानपेशा ह्मणूं. या पेशांचा स्मरणशक्ति, विचार, इच्छा इत्यादि मनोव्यापारांशी संबंध आहे असे म्हणतात.
 मोठ्या मेंदूतून एकंदर चोवीस मोठे ज्ञानतंतू बाहेर निघालेले आहेत. यांपैकी काहींचा घ्राणेद्रियाशी, काहींचा श्रवणेंद्रि-