पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

तंतूंचे द्वारे मोठ्या मेंदूतील सुखदुःखादि भावनास्थानास जाऊन पोहोंचते. तेथून ती बातमी विचारोत्पत्तिस्थानाकडे जाते. या ठिकाणी या बातमीचा नीट खल होतो व तेथून प्रवृत्तिस्थानास शिवी देणारास थप्पड दे, उलट शिवी दे, असा काहीतरी हुकूम सुटतो व या हुकुमाची लागलीच अंमलबजावणी कमेंद्रियांकडून होते. ज्ञानतंतू गुप्तपोलिस आहेत असे आपण समजूं. यांना जी बातमी मिळेल ती ते भावनास्थानी कळवितात, म्हणजे पोलिसहपीसांत कळवितात. या ठिकाणी कच्चा तपास होतो, व नंतर विचारोत्पत्तिस्थानांत म्हणजे न्यायकोटात या खटल्याची चौकशी होते व निकाल होतो. अपराध्यास शिक्षा अगर दंड काय करावयाचा याबद्दल प्रवृत्तिस्थानाकडे म्हणजे अंमलबजावणीखात्याकडे हुकूम जातो व हुकुमाची अंमलबजावणी होते. परमेश्वराने मेंदूतसुद्धां न्यायखाते व अंमलबजावणीखाते ही वेगळी ठेविली आहेत ! केवढा चमत्कार हा ! आणि या गोष्टी होतात तरी किती जलद !

लहान मेंदू.

 हा मानेच्या वरच्या बाजूस डोक्याच्या आंत असतो. याचा आकार लहानशा नारिंगाएवढा असतो. याचा संबंध, हालचाल करणाऱ्या अगर चलनवलनाच्या स्नायूंशी विशेष असतो. लहान मेंदूस जर दुखापत झाली तर आपणांस शरीर तोलून धरितां येत नाही, व चालतांना झोंक जातो; अर्धाग म्हणून ज्यास म्हणतात तो विकार लहान मेंदू बिघडल्यामुळेच होतो. [ पुस्तकाचे आरंभी दिलेलें चित्र पहा.]

मज्जारज्जु.

 हा एक मेंदूचाच लांब दोरीसारखा भाग असावा असे वाटते. याची जाडी हाताच्या मधल्या बोटाएवढी असते. हा फार नाजूक असल्यामुळे यास पाठीच्या कण्यांच्या पोकळीत ठेविले आहे. पाठीचा कणा मुद्दाम पोकळ नळीसारखा केलेला आहे.मज्जारज्जूस पुष्कळ शाखा असतात, यांस ज्ञानतंतू म्हणतात.ज्ञानतंतूंनाहि असंख्य बारीक बारीक