पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)

निराशा या रोगांनी पछाडलेले असते त्याचे शरीरहि हळू हळू क्षीण होत जाते. यावरून मन व शरीर यांमध्ये परस्पर कसा निकट संबंध आहे हे सिद्ध होते. असो. शरिराचा व मनाचा अगदी निकट संबंध आहे व शरिराच्या स्थितीवर मनाची स्थिति व मनाचे स्थितीवर शरिराची स्थिति अवलंबून असते असे जरी वर सांगितले आहे, तरी मेंदू व मज्जारज्जु यांचाच मनाशी निकट संबंध आहे, शरिराच्या दुसऱ्या कोणतेहि भागाचा नाही, एवढे माल या ठिकाणी सांगणे अवश्य आहे. सबब मेंदू व मज्जारज्जु वगैरे काय वस्तु आहेत त्यांचे थोडक्यांत वर्णन केले पाहिजे.

मेंदू.

 मेंदू म्हणून जो पदार्थ आहे तो आपल्या डोक्यांत एका लहानशा मजबूत पेटीत परमेश्वराने ठेविला आहे. हा पदार्थ मऊ मेणासारखा असून अगदी नाजूक आहे. याच्यावर एकंदर सहा आच्छादने आहेत. पेटीच्या बाहेरच्या अंगास दोन व आंतील अंगास चार. आपण एखादा कागद चुरमडून टाकावा व नंतर तो उलगडून साफ करून पाहावा, म्हणजे त्यावर जशा सुरकुत्या पडलेल्या दिसतात तशाच तऱ्हेच्या सुरकुत्या मेंदू पाहिला असता त्यावर दिसतात. मेंदूचे दोन निरनिराळे भाग झालेले आहेत. या भागांना मोठा मेंदू व लहान मेंदू अशी नांवें दिली आहेत.

मोठा मेंदू.

 याचा आकार नारिंगाएवढा असतो, व याचे तीन निरनिराळी कामें करणारे भाग आहेत. एका भागांतून विचाराची उत्पत्ति होते असे म्हणतात; यास आपण विचारोत्पत्तिस्थान असें नांव देऊ. दुसन्यांत सुखदुःखादि भावना होतात; या भागास आपण भावनास्थान असें म्हणूं व तिसऱ्या भागास आपण प्रवृत्तिस्थान म्हणूं; कारण या भागांत कृतीची उत्पत्ति होते.
 कोणी एकजण आपल्याकडे आला व त्याने आपल्यास विनाकारण शिवी दिली असे समजा.आतां ही शिवी कर्णातील ज्ञान-