पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५६)

इत्यादि सर्व काही 'शील ' या शब्दाने दर्शविले जाते.
 शील व गृहशिक्षण:-- गृहशिक्षणाचाच शील बनविण्याच्या कामी विशेष उपयोग होतो. गृहशिक्षण चांगले असले म्हणजे शिक्षकांचे काम सुलभ होतें.
 शील व शाळा:- मुलांस शाळेंत नीट वळण लावता येतें; कारण त्यांचे मन लवचिक असते.
 शाळेंत शील बनविण्यास उपलब्ध असणारी साधनें:- (१) अध्यापन; (२) शिस्त; (३) चांगल्या संवयी लावणे; (४) शिक्षकांचे उदाहरण; (५) मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तींची पूर्ण माहिती. यांपैकी, पहिल्या चार गोष्टींचा पूर्वी बराच विचार केला आहे.
 हेतु व त्यांचे महत्त्वः-- (१) हेतु कृतीस कारणीभूत असतात ही गोष्ट लक्षात ठेवावी. (२) हेतूंचे स्वरूप समजणे म्हणजे मुलांचा स्वभाव समजणे होय. (३) कोणत्या हेतूंचा केव्हां उपयोग करावा हे शिक्षकाने ठरविले पाहिजे. (४) मुलांस कृतिकरावयास लावण्यास भीती, कृतिप्रेम, जिज्ञासा, बक्षिसे यांसारख्या हेतूंचाच उपयोग करावा. (५) मुले जसजशी मोठी होत जातात व त्यांच्या बुद्धीचा विकास होत जातो तसतसा हेतूंत फरक करावा लागतो.
 मुलांची नैसर्गिक प्रवृत्ति व तिचे महत्वः- मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्ति समजल्या म्हणजे कोणत्या हेतूंचा केव्हां उपयोग करावा तें समजतें.

 मुलांस सद्गुण कसे लावावे याविषयी काही माहिती:- (१) मुलास प्रत्यक्ष कृति करण्यास लावावें. (२) शिस्त चांगली असावी. (३)बुद्धीचा विकास करावा. (४) चांगल्या भावनांचा विकास करावा.(५) प्रवर्तकशक्तीचाहि विकास करावा.