पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४१)

म्हणतो. संवयीचा परिणाम काही विलक्षण तऱ्हेचा असतो. निजण्याचे पूर्वी किंवा निजून उठल्याबरोबर घड्याळास किल्ली द्यावयांची ती जर आपण द्यावयास विसरलों, तर चुकल्यासारखे होते, दुसरे काही कामसुचत नाही, हा अनुभव पुष्कळांस आला असेलच, संवयीचा जोर तीन गोष्टींवरून कळतोः-(१) काहीतरी संवयीस उद्दीपक मिळताच किती जलद ती जागृत होते ही एक गोष्ट; (२) संवयीवर दाब ठेवण्यास होणारी तसदी ही दुसरी; (३) संवयीची जर सफलता झाली नाही तर त्यापासून होणारे दुःख अगर असमाधान ही तिसरी. कोणतीहि संवय घ्या, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो, एकदां जडली म्हणजे सुटणे फार कठीण पडते. असे म्हटले आहे की संवय ही दुय्यम स्वभावच होय. स्वभावास काही औषध नाही असें आपण पुष्कळ वेळा म्हणतो; संवयींविषयींहि असें म्हणण्यास हरकत नाही. यावरून चांगल्या संवयींची आवश्यकता दिसून येईल. मुलांना चांगल्या संवयी लावणे हे शिक्षकांचें व आईबापांचें आद्य कर्तव्य होय. असो. कोणतीहि संवय होण्यास दोन गोष्टींची जरुरी असते. आरंभी कांही ऐच्छिक व्यापार व्हावा लागतो (अवधान एकाग्र लागते); व एकाच क्रियेची एकसारखी पुनरावृत्ति व्हावी लागते; कोणतीहि संवय (शारीरिक, मानसिक,नैतिक )लहान वयांत लवकर लाविता येते. कारण याकाळी मुलांचा मेंदूं लवचीक असतो, व म्हणून फारसे श्रम पडत नाहीत. संवय ही एक फार उपयुक्त वस्तु आहे. संवयीचे साहाय्याने अवघड क्रिया सहज करितां येतात, व यामुळे मानसिकशक्तीचा याकामी होणारा व्यय वांचतो; व तिचा अन्य कामी उपयोग करितां येतो. मनोविकास करण्याचे कामी संवयीची बरीच मदत होते. संवयीने एक क्रिय चांगली येऊ लागली की मग त्या क्रियेपेक्षां अवघड अशी दुसरी क्रिया करितां येणे शक्य होते. संवयीचा अतिरेक झाल्यास मात्र ती विकासविघातक होते. कोणत्याहि संवयीची किंमत तिचे सामान्यस्वरूपावर अवलंबून असते. आपणांस चांगल्या संवयी लागल्या