पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३९)

कांक्षेमुळे अगर दुसऱ्यावर वरचढ करण्याचे हेतूमुळे, प्रीति किंवा आश्चर्य यामुळे अनुकरणक्रियेची उत्पत्ति होत असावी. मुलांचे ठायी असलेली कृतिप्रेम ही भावना जशी अत्यंत महत्त्वाची आहे, तशीच अनुकरणक्रियाहि आहे. मुलांच्या ऐच्छिकचलनक्रियांचे, विकासास अनुकरणक्रियेची फार मदत होते. अनुकरणाचे जोरामुळे ऐच्छिक चलनक्रियांची मर्यादा वाढते व पुष्कळ उपयुक्त क्रिया मुले शिकतात.
 अनुकरणक्रियेचा जोर तीन गोष्टींवर अवलंबून असतोः-(१) इंद्रियांतील तरतरी ( इंद्रियांत स्नायुहि येतात हे पूर्वी सांगितले आहेच ); (२) दुसऱ्यांच्या चलनवलनक्रिया पाहून त्यांविषयी अभिरुचि उत्पन्न होणे व (३) चलाख स्वभाव. ज्या मुलांचे ठायीं या तीन गोष्टी बऱ्याच प्रमाणाने आढळून येतात त्यांचे अनुकरण बरेंच, जोरदार असते. अर्थात् ऐच्छिक चलनवलनक्रिया त्यांच्या सपाटून चालतात. या रीतीनें प्राप्त झालेल्या ऐच्छिक चलनवलनक्रियांतहि हळू हळू फेरबदल होत जातो. या क्रिया होण्यास आरंभी कांहीतरी बाह्य प्रेरणा लागते, परंतु कालांतराने या प्रेरणेची जरूर लागत नाही. इंद्रियें कह्यांत ठेवता येऊ लागली की प्रवर्तकशक्तीच्या उच्च व्यापारांची तयारी होत चालली असे समजावें. या उच्च व्यापारांत आढळून येणारे विशिष्ट गुण-दीर्घप्रयत्न, निश्यय, करारीपणा - मुलांचे अगदी बाळपणचे कृतीतहि दिसून येतात. असो. प्रवर्तकशक्तीची वाढ व विकास चलनवलनक्रियांचे स्वरूपांवरून ठरविता येतात. तेव्हां या क्रियांचे निरनिराळे प्रकार या ठिकाणी सांगितले पाहिजेत. यांचे मुख्य दोन प्रकार आहेत (१) ऐच्छिक व (२) अनैच्छिक. अनैच्छिक चलनक्रियांचे तीन प्रकार आहेत; (अ) संधानरहित. (ब) प्रतिक्षिप्त व (क) प्रकृतिसिद्ध. यांची काही उदाहरणे देतो म्हणजे या क्रियांचे स्वरूप समजेल.
 संधानरहितः- मुले हातपाय हालवितात, अंग ताठवितात-