पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३६)
गोषवारा.

 नैतिक उच्च भावनाः- एखाया मनुष्याचे वर्तन व त्या वर्तनाचा हेतु या गोष्टींचे जेव्हां आपणांस ज्ञान होते तेव्हा ज्या भावना उत्पन्न होतात त्यांस नैतिक-उच्च-भावना म्हणतात. या भावना सुखजनक असतात व दुःखजनकहि असतात. कर्तव्यज्ञान हे नैतिक भावनांतील मुख्य घटक द्रव्य होय. दुसऱ्याच्या वर्तनासंबंधी जेव्हा आपण निर्णय करितों तेव्हा आपण नैतिक नियमांच्या आधारें तो निर्णय करितों.
 नीति-नियमांविषयी निरनिराळ्या लोकांची निरनिराळी मते आहेत.
 नैतिक भावनांची वाढ:- (१) मुले भित्री व नम्र असतात; यामुळे त्यांच्या नैतिक भावना विकास पावतात. (२) बुद्धीचा विकास जसजसा होत जातो तसतशी मुलांस शिस्त आवडू लागते. (३) सामाजिक भावनांच्या विकासावरहि नैतिक भावनांचा विकास बराच अवलंबून असतो. (४ ) सदसद्विवेकाच्या तंत्राने मुलांचे आचरण होऊ लागले म्हणजे नैतिक भावनांचा पूर्ण विकास झाला असे समजावें.
 नैतिक भावनांचं शिक्षण:- (१) घरांतील शिस्त, शाळेतील शिस्त, आईबाप, सोबती व शिक्षक यांचे अनुकरण, वाचनांत येणाऱ्या गोष्टी या सर्व गोष्टींवर नैतिक शिक्षण अवलंबून असते. (२) नियमांची अमलबजावणी योग्य प्रकारे करावी. (३) शिक्षकाचे स्वतांचे आचरण नीतिशुद्ध असावें. (४) सुकृति व दुष्कृति यांमधील फरक मुलांना योग्य संधि मिळताच दाखवावा. (५) इतिहास, कादंबऱ्या, नाटके यांतील निवडक भागांचाहि नैतिक शिक्षणाच्या कामी चांगला उपयोग होतो.

भाग एकोणिसावा.
प्रवर्तकशक्ति.

 मन में त्रिमूर्त आहे असें पूर्वी एकदां सांगितले आहेः- तीन