पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३०)

एखादे सुंदर पदार्थातील रमणीयता ग्रहण करितां येते, त्यास एखादे माणसाचे कृतीतील व स्वभावांतील नीतिविषयक भागाचे लवकर ग्रहण करितां येईल; व हे ग्रहण करणे हाच नैतिक पाया होय.

गोषवारा.
सौंदर्यविषयक उच्च भावना.

 सौंदर्यविषयक उच्च भावनाः- - सौंदर्य या शब्दाचा अर्थ माधुर्य, रमणीयता, चित्ताकर्षकता असा व्यापक घ्यावयाचा. या भावना सुखजनक असतात. बौद्धिक विकास जसजसा जास्त जास्त होत जातो तसतशा या भावना वाढत जातात.
 या भावनांत दोन घटकावयव सांपडतात:-
 (१)इंद्रिय-दत्त द्रव्य- संवेदनें.
 (२)बौद्धीक द्रव्य:- बोधशक्तिद्वारे होणारे ज्ञान. या भावना शुद्ध असतात व यांपासून मिळणारे सुख उच्च प्रकारचे असतें.
 सौंदर्यविषयक भावनांची वाढः-- बौद्धिक विकास व भावनांचा विकास यांवर या भावनांची वाढ अवलंबून असते.
 सौंदर्यविषयक भावनांचे शिक्षण:- (१) मुलांच्या समोर सुबक व चित्रविचित्र वस्तु नेहमी आणाव्या व त्यांचे नीट निरीक्षण करवावें. (२) सृष्टिसौंदर्याकडे मुलांचे लक्ष लावावे. (३) मुलांचे ठिकाणी असलेली कृति-प्रेम ही भावना वाढवावी. (४) गायन, वाङ्मय वगैरे विषयांत अभिरुचि उत्पन्न करावी. (५) सौंदर्यविषयक भावनांस शिक्षण दिल्याने नैतिक शिक्षणास बरीच मदत होते.

भाग अठरावा.
नैतिक उच्च भावना.

 नैतिक उच्च भावनांचा संबंध मनुष्याच्या ऐच्छिक कृतींशी येतो. हेतूवांचून कृति होत नसते व कृतींचा समूह म्हणजेच वर्तन अगर