पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२३)

ने टिकेल तर बौद्धिक विकासे बरोबर होणार नाही. यावरून ज्ञानप्राप्ति वै अभिरुचि यांचा किती निकट संबंध आहे हे दिसून येते. नवीन नवीन कल्पनांचा मुलांचे मनांत भरणा होऊ लागला म्हणजे त्यांच्या जिज्ञासेसहि चांगले वळण लागते. ती मुद्देसूद प्रश्न करितात व या प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यांना मिळाली म्हणजे मात्र ज्ञानार्जनापासून होणाऱ्या खऱ्या आनंदाचा त्यांना अनुभव येतो. याच अनुभवास उच्च बौद्धिकभावना ही संज्ञा खरोखर देता येते. परिस्थिति व नैसर्गिक कल यांचे जसें स्वरूप असेल त्याप्रमाणे मुलांची ज्ञानपानाभिरुचि असते. उदाहरणार्थ-- ज्या मुलाचा मूळस्वभाव चलाख असतो, त्यास बालोद्यानांतील देणग्यांतच गोडी लागते. तसेच एखाद्या चिताऱ्याच्या मुलास रंग देणे व चित्र काढणे यांपासून जसा आल्हाद वाटतो तसा दुसऱ्या कृतींनी वाटत नाही. परिस्थिति ज्या तऱ्हेची असेल त्या तऱ्हेचे वळण मुलांचे जिज्ञासेस मिळते. वडील भावास एखादे विषयाची आवड असली की धाकटे भावास त्याच विषयांत गोडी लागू लागते. कारण वडील माणसांचे अनुकरण करणे हा मुलांचा स्वभावच असतो. बौद्विकउच्चभावनांचे संवर्धनांत दोन गोष्टींचा समावेश होतो, (१) एखादे विशिष्ट विषयांत अधिकाधिक आभिरुचि वाढविणे व (२) ती अशा तऱ्हेनें विस्तृत करावयाची की, तेणेकरून जो विषय पुढे येईल त्यांत तिचा शिरकाव व्हावा. या दोन गोष्टी अमळ परस्पर विरोधी आहेत. कारण पहिलीने अभिरुचि विशिष्ट होते व दुसरीने सामान्य होते.
 बौद्धिक भावनांचे शिक्षणः-- या भावनांचे शिक्षण देतांना होतां होईल तो निसर्गानुकरण करावे. कोणतेहि विषयांत मुलांना कधीहि आपोआप व त्वरित गोडी लागत नसते, व ती तशी लागणेहि अशक्य आहे, ही गोष्ट शिक्षकानें नेहमी लक्षात बाळगावी. जो विषय शिकवावयाचा असेल त्याची अभिरुचि उत्पन्न केल्याविना त्याचे खरे ज्ञान होत नसते. तेव्हा या कामी योग्य साधनांचाच आरंभी उपयोग केला पाहिजे. ज्या गोष्टींची अगर