पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२१)

आरंभी सहानुभूति अगदी कोती असते, परंतु पुढे पुढे ती विस्तृत होते.
 सहानुभूतीचे शिक्षण (१) मुलांना प्रेमाने वागवावें, त्यांच्या अडचणी दूर कराव्या व त्यांची सहानुभूति मिळवावी. (२) मुलामुलांतहि सहानुभूति असावी.

भाग सोळावा.
उच्चभावना.

बौद्धिक उच्च भावना.

 बौद्विक व्यापार चालू असतांना त्यांतून एका प्रकारच्या विशिष्ट भावना उत्पन्न होत असतात. यांसच बौद्धिक उच्च भावना असें म्हणतात. तात्विक भावना, ज्ञानपानसुख, सत्यप्रीति वगैरे अन्य संज्ञाहि या भावनांना देण्याचा प्रघात आहे. उच्च भावनांचा पूर्ण विकास मोठेपणी होतो. तरी पण बाल्यावस्थेत यांचा अंकुर दृष्टोत्पत्तीस येतो. शिक्षकाचे काम या अंकुराची जोपासना करून तो वाढविणे हे होय. लहान मुलांचे ठायी असणारी जिज्ञासा बौद्धिक उच्च भावनांपैकींच होय; व ही असते म्हणूनच मुले नेहमी कांहींना काहीतरी कृति करीत असतात.
 कुतूहल:-अगोदर कुतूहल व नंतर काही कालाने जिज्ञासा अगर ज्ञानार्जन-लालसा उत्पन्न होते असे म्हणतात. मुलें पुष्कळ वस्तु पहातात व त्या पाहून त्यांना कुतूहल वाटते; आणि तेणेंकरून त्यांची जिज्ञासा जागृत होते, व म्हणूनच 'हे काय, ते काय, तें असें कां' यांसारखे प्रश्न मुलें नेहमी विचारतात. या प्रश्नांची जर त्यांना योग्य उत्तरे मिळाली नाहीत तर त्यांना एक प्रकारचे असमाधान वाटते व स्वतांच्या अज्ञानाबद्दल वाईट वाटते, व ते अज्ञान नाहीसे करण्याच्या उद्योगास ती लागतात. जर त्यांना या कामी यश आल तर आनंद होतो. बौद्धिक उच्च भावना सर्वतोपरी सुखोत्पादक असतात असे नाही. दुःखापासून मूळ या भाव- ११