पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११७)

व साधारण बौद्धिक विकास यांवर सहानुभूति अवलंबून असते. ज्या मुलांची कल्पनाशक्ति कोती असेल त्यांस नवीन नवीन भावनांचें काल्पनिक ग्रहण करितां येत नाही; मग सहानुभूति वाटणार कशी ? ज्ञानेंद्रियेच जर लेचीपिची असली तर मनास बोधच बरोबर होणार नाही. मनावर में कार्य व्हावयाचें तेंच नीट णारहे नाही. मग साहानुभूतिद्वारे प्रतिकार्य होण्याची आशाच नको.बुद्धीचा विकास जसजसा जास्त होत जातो तसतशी सहानुभूतीची मर्यादा वाढते. सहानुभूतीचे मार्गात काही अडचणी येत असतात:-(१) कांही शारीरिक व (२) कांहीं मानसिक; त्या येणेंप्रमाणे:- म्हातारपण, वाईट शरीरप्रकृति, काहीतरी शरिरास अपाय, या गोष्टी सहानुभूतिविघातक होत. तसेच राग, द्वेष, हेवा, मत्सर, अज्ञान हे मानसिक रोगहि सहानुभूतीचे आड येतात. असो; आता आपण सहानुभूतीची वाढ कसकशी होत जाते ते पाहूं.
 सहानुभूतीची वाढः- आपल्याविषयीं दुसऱ्याची सहानुभूति आहे याचे थोडेबहुत ज्ञान मुलास असते. आपणास दुःख झाले असतां गाणे म्हणून अगर भांडे वाजवून अगर पाळण्यांत घालून हलवून अगर अन्य उपायांनी आई आपलें सांत्वन करीत असते, हे मूल पाहातें, व तेणेकरून आईच्या सहानुभूतीचें थोडेबहुत ज्ञान मुलास होत असावे असे दिसते. पहिले वर्ष संपतां संपतां मुलाचे ठायीं अनुकरणकृति दृष्टोत्पत्तीस येते. आई हसली की मूल हसते, आईनें तोंड वाईट केलें की मूल तसेंच करितें, दुसरें एखादें मूल रडतांना ऐकलें की मूल रडू लागते, वगैरे गोष्टी पुष्कळांनी पाहिल्या असतील. या अनुकरणकृतींत सहानुभूतीचा अंश हा असतोच. सहानुभूतीचा पूर्ण विकास होण्यास बौद्धिक व्यापाराची गरज लागते. दुसऱ्यास झालेल्या दुःखाचें कल्पनाशक्तीचे द्वारें अगोदर ग्रहण झाले पाहिजे, मग ते दुःख नाहीसे करण्याकरितां अगर कमी करण्याकरितां आपल्याकडून कृति झाली पाहिजे. ही कृति होण्याकरिता प्रवर्तकशक्तीवर विचारशक्तीचा अंमल झाला पाहिजे. तात्पर्य, बौद्धिक विकास जसजसा होत जातो तसतशी