पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११४)

असेल, तर त्यांनी शब्दांनी पसंती दाखवावी अशी आपणांस साहजिकच इच्छा होते. आपलेपेक्षा जी माणसे वडील असतील त्यांना काय आवडते, काय नाही, या गोष्टींकडे मुलांचे नेहमी लक्ष असतें. बहुधा वडील माणसांना जे रुचेल तेंच करण्याकडे मुलांची प्रवृत्ति असते. राग, भीति या भावनांप्रमाणे ही भावना अपायकारक नाही. मुलांना उद्योग करावयास लावण्यास या भावनेचा उपयोग करावा. शिक्षकाविषयों मुलांचे मनांत जर पूर्ण आदर असेल, तर शिक्षकाकडून शाबासकी मिळावी, शिक्षकास बरें वाटावें, त्याचे मन दुखू नये, एतदर्थ मुले आपणांकडून शक्य तेवढा प्रयत्न करितात. शिक्षकाने मुलांविषयी पूर्ण सहानुभूति दाखवावी, त्यांचेवर ममता करावी, त्यांच्या कल्याणार्थ सदा झटावें; व असें करून आपणाकडे मुलांचे मन आकर्षण करून घ्यावे. एखाद्या मुलाने आपले काम बरे केले म्हणजे त्याबद्दल त्यास शाबासकी द्यावी, अगर निदान नुसती आपली पसंती तरी दर्शवावी. कित्येक शिक्षकांना मुलांची एकसारखी स्तुति करण्याची संवय लागलेली असते. पण एवढ्या तेवढ्या यःकश्चित् कृतीबद्दल प्रशंसा केल्याने आपल्या प्रशंसेची किंमत कमी होते, ही गोष्ट नेहमी शिक्षकांनी ध्यानांत बाळगावी. काहीतरी विशेष कृति मुलांनी केल्याशिवाय त्यांची स्तुति करूं नये. नुसती पसंती दर्शविण्यास केव्हांहि हरकत नाही. शिक्षणाचा अंतिम हेतु स्वावलंबन व स्वतंत्रता ( अर्थात् आचारांत व विचारांत ) हे तत्त्व शिक्षकांनी आपले नजरेसमोर ठेवावें. जी मुले मोठी असतील त्यांना आपले कृतीची खरी किंमत काय याचा निर्णय करण्यास शिकवावें, व बरें कोणतें, वाईट कोणते हे समजावून द्यावे.

गोषवारा.

भीति:- प्रकृतिसिद्ध, दुःखमूलक व अपायकारक; बौद्विक विकास केल्याने व धैर्य वाढविल्याने ही भावना कमी होते.
रागः- हीहि भावना प्रकृतिसिद्ध व अपायकारक आहे; ही थोडीबहुत कमी केली पाहिजे व थोडीशी राखिली पाहिजे; शिस्त कडक