पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१११)

ही भावना ज्या अर्थी मुलांचे ठायीं स्वाभाविक असते, त्या अर्थी ती उत्पन्न करण्याची गरज नसते; तेव्हां फक्त हिला योग्य वळण लावून दाबांत ठेवणे हेच शिक्षकाचे मुख्य कर्तव्य होय. शाळांची अंतर्घटना अशाच प्रकारची असते की, तिच्यामुळे स्पर्धा या भावनेची साहजिकच वाढ होते. मुलांचे लक्ष स्तुत्य गोष्टींनी आकर्षिलें जावें एतदर्थ शिक्षकांनी झटावें. अमुक एक कृति चांगली आहे म्हणून ती करावयाची, दुसऱ्यावर वरचढ करण्याकरिता ती करावयाची नाही, अशी मुलांचे मनाची प्रवृत्ति करून दिली पाहिजे. उच्च सामाजिक भावनांचाहि विकास करावा. सहानुभूति या भावनेचा विकास केल्याने स्पर्धेचा जोर कमी होतो. शाबासकी, बक्षिसे वगैरेचा योग्य उपयोग केल्यास या भावनेस चांगले वळण मिळतें. एकंदरीत पहातां बक्षिसे वगैरेचा उपयोग करणे चांगले नाहीच. बक्षिसे नेहमी लायक मुलांसच मिळतात असे नाही. ज्या मुलांस परीक्षेत पुष्कळसे मार्क मिळतात, ज्यांचा नंबर चांगला वर येतो, अशांनाच बक्षिसे मिळतात, व ज्या मुलांचे शील चांगले व आचरण चांगले अशांना काहीएक मिळत नाही. बौद्धिक गुणांपेक्षा नैतिक गुणांची किंमत अधिक ही गोष्ट कोणीहि कबूल करील. जी मुलें आळशी असतात, त्यांना काम करावयास लावण्याकरितां स्पर्धा या भावनेचा उपयोग करावा; मात्र तो बेताबेताने करावा.
 स्तुतिप्रियताः- मनुष्यप्राणीचसा काय, परंतु घोडा, कुत्रा वगैरे जनावरांनासुद्धां पंसतीदर्शक शब्दांनी त्यांची केलेली स्तुति आवडते. आपलेविषयी दुसऱ्याचें मत चांगले असावे, दुसऱ्यांनी आपणास चांगले म्हणावे, अशी इच्छा साहजिकच प्रत्येक मनुष्याची असते. स्तुतिप्रियता या भावनेचा संबंध ज्या अर्थी दुसऱ्याशी येतो त्या अर्थी हीत थोडाबहुत सामाजिक अंश असतोच. लहानपणी आपणांस आपल्या कोणत्याहि कृतीविषयी स्वतंत्र तहेर्ने निर्णय करण्याची शक्ति नसते. अर्थात् त्यावेळी आपणांस दुसऱ्यांकडे पाहावे लागते, व दुसऱ्यांना आपली कृति जर पसंत