पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१११)

निःपक्षपातीपणाचे व सहानुभूतियुक्त असते असे दाखवावे. काही कांही शिक्षकांची प्रवृत्ति श्रीमंतांचे मुलांस लाडीकपणा दाखविण्याकडे विशेष असते. त्या मुलांनी काही अपराध केला व शिस्त मोडली तरी चकार शब्द काढावयाचा नाही. गोरगरिबांचे मुलांवर मात्र करडी नजर ठेवावयाची; परंतु हे बरोबर नाही. अशा वर्तनानेच मुलांना बहुधा संताप येतो, व तो सकारण व योग्य असतो. शिक्षा केल्याबद्दल मुलें बहुतकरून रागावत नाहीत. मुलांचे विचारशक्तीचा विकास करावा व प्रवर्तकशक्तीस वश करून घेऊन राग या भावनेचा जोर कमी करावा. ही भावना समूळ नाहीशी करण्याचा यत्न करू नये. कारण शिस्त राखण्यास ही उपयोगी पडते. सामाजिक भावनांचा विकास केल्याने सर्व अहंपर भावनांचा जोर कमी होतो, हीहि गोष्ट शिक्षकानें विसरता कामा नये. कधी कधी फारसा अपाय होण्याचा जर संभव नसेल तर मुलांस आपले रागाचे परिणाम भोगू द्यावेत. काहींचें असें मत आहे की, शारीरिक उपायांनी राग नाहीसा करितां येतो. राग आलेल्या माणसास थोडेसे पाणी पिण्यास द्यावें व खाली बसवावें.
 कृतिप्रेमः-- [ कृति करण्याची हौस ] लहान मुलांना कधीहि स्वस्थ बसवत नाही; ती काहीतरी करीत असतात. ही कृति करण्याची हौस परमेश्वराने मुद्दाम त्यांचे ठायी ठेविली आहे. ही भावना सुखमूलक व अहंपर आहे. कारण आत्मोन्नति करण्यास हिची जरूर असते. फ्रोबेलने जर कोणता मोठा शोध लाविला असेल तर तो- " शिक्षण म्हणजे विकास, व विकास स्वकृतीवांचून होत नसतो" -- हा होय. मुलांचे कृतींत अडथळा आला म्हणजे ती अधिक जोरानें कृति करूं लागतात, व जर त्यांना तो अडथळा नाहीसा करितां आला तर बरे वाटते;- एका प्रकारचे समाधान होते व स्वतांचे ठायी असलेली शक्ति दृश्य होत जाते. या भावनेच्या स्वरूपावरून ही अपायकारक मुळीच नाहीं; अथात् हिचा विकासच केला पाहिजे ही गोष्ट सिद्ध होते; तेव्हां शिक्षकाने यासंबंधी काय काय केले पाहिजे त्याचा येथे विचार करूं. कृति केल्यावांचून