पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०८)

गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे:-- निवडक पाठांचा उपयोग करणे (२) बौद्धिक विकास व (३) स्वतांचे उदाहरण. भावना कृतींत उतरल्या पाहिजेत; नाहीतर त्या असून नसून सारख्याच.

भाग चवदावा.
अहंपरभावना.

 भीतिः-- एखादें अपरिचित माणूस अगर जनावर पाहून अगर कर्कश स्वर अगर भाषण ऐकून ही भावना मुलांचे मनांत प्रथम उत्पन्न होते. ही प्रकृतिसिद्ध असते असे कोणी म्हणतात. भीति म्हणून जीस आपण म्हणतो ती खरी भावना थोडी उशिरां दृष्टोत्पत्तीस येते.
 आपणांस काहीतरी अपाय होणार अशी कल्पना मनासमोर उभी राहिल्याविना खरी भीति उत्पन्न होत नसते; इतकेच नव्हे तर पूर्वी कधीतरी दुःखाचा अनुभव आलेला पाहिजे व त्याची आठवणहि झाली पाहिजे.
 भीति ही भावना दुःखमूलक आहे.शारीरिक व मानसिक व्यापारांवर या भावनेचा तात्काल परिणाम होतो. एखादें माणूस जर फार भ्यालेले असले तर त्याचे रुधिराभिसरण, श्वासोछ्वास, स्नायूंतील शक्ति, यांत फेरबदल होतो; अंगास कंप सुटतो; घाम येतो. ज्या कारणामुळे भीति उत्पन्न झालेली असेल त्याचे ठायी अवधान एकाग्र होते; सर्व मनोव्यापार बंद पडतात. कल्पनाशक्ति मात्र प्रबल होते. परंतु ती भलतेच काम करू लागते. भीति या भावनेस अनुकूल असें कार्य तो करूं लागते. एकंदरीत ही भावना अपायकारक असते असे म्हणण्यास हरकत दिसत नाही. तेव्हां ही भावना समूळ नाहीशी करावी किंवा काय असा प्रश्न साहजिक पुढे येतो. एक सामान्य गोष्ट याठिकाणी सांगितली पाहिजे ती ही;-कोणतीहि भावना समूळ नाहीशी