पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०६)

मुळीच सोडीत नाहीं; कारण द्रव्यसंचय करणे ही एक कल्पना. त्याचे ठिकाणी विलक्षण प्रबल झालेली असते. अशी जरी स्थिति आहे, तरी भावनांना शिक्षण हे दिलेच पाहिजे. कां तें वर सांगितलेच आहे. तर या बाबतीत शिक्षकास काय करितां येण्यासारखे आहे ते आपण पाहूं. शिक्षकाने मुख्यतः तीन गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे-(१) निवडक पाठांचा उपयोग करणे (२) बुद्धीचा विकास करणे व (३) स्वतांचे उदाहरण.
 (१) शाळांची शिस्त अशा तऱ्हेची असावी की तीमुळे बौद्धिक उच्चभावना ( सत्यप्रीति ) व नैतिक उच्चभवाना ( कर्तव्याभिरुचि ) यांचे संवर्धन झाले पाहिजे. भावनांचे संवर्धन करण्याचे प्रसंग रोज येतात; मात्र शिक्षकाने त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. दुसऱ्याचे दुःख पाहिलें म्हणजे साहजिकच कळवळा बाटतो; दुसऱ्याने आपणांवर प्रीति केली म्हणजे आपणांसहि दुसऱ्यावर प्रीति करावीशी वाटते. परमेश्वराचे भजनपूजन ज्या ठिकाणी चाललेले असेल अशा ठिकाणी जर आपण गेलो, तर आपण कितीहि जरी नास्तिक असलो तरी एक पळभर तरी आपले मनांत धार्मिक भावना उत्पन्न होतात, यांसारख्या गोष्टींचा विचार केला म्हणजे भावनांचे शिक्षणाची दिशा दिसून येते. (२) बौद्धिक व्यापार, प्रवर्तक व्यापार व भावना यांमध्ये अगदी निकट संबंध आहे ही गोष्ट वर दोनचार वेळा तरी सांगितली आहे; तेव्हां बुद्धीचे विकासाचा परिणाम भावनांवर काहींना काहीतरी झालाच पाहिजे. (३) भावना संसर्गजन्य आहेत असे एके ठिकाणी लिहिलेले आहे. यावरून उदाहरणाचे काय महत्त्व आहे ते समजतें. मुलांचे सभोवार जी माणसे असतील त्यांच्या ज्या प्रकारच्या भावना असतील तशाच भावना मुलांचे मनांत उत्पन्न होतात. शिक्षक जर ममताळू असेल तर मुलेहि तशीच होतात, वगैरेविषयी वर उल्लेख केला आहेच. कोणतीहि भावना कृतीत उतरली पाहिजे, नाहीतर ती शिक्षणदृष्टया असून नसून सारखीच. मुलांच्या भावनांशी झगडणे व त्या कह्यांत