पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०५)

तच नसतात. अशा वेळी जर त्यांचे रागावर दाब ठेविला नाही तर त्यांचे शरिरास व मनास अपाय होण्याचा फार संभव असतो; तद्वतच सामाजिक भावनांचा विकास करावा लागतो; कारण नैतिकदृष्टया व शील बनविण्याचे कामी त्यांचा फार उपयोग होतो. तसेंच सत्यप्रीति, कर्तव्यतत्परता, सृष्टिसौंदर्याभिरुचि यांसारख्या उच्चभावनांचाहि विकास करणे अवश्य आहे. भावनांस योग्य वळण लावणे हे काम सोपे नाही. त्याचे पहिले कारण असे की ते अप्रत्यक्ष तऱ्हेने करावे लागते. परिस्थितीत कांहीएक विवक्षित फेरफार करावा लागतो; व मग परिस्थितीचे कार्य भावनांवर होते. तात्पर्य, शिक्षकास अगोदर परिस्थिति वश करून घ्यावी लागते; व मग तिचे मार्फत सर्व काम होते. मुलांस सुसंगति लागेल अशाच परिस्थितीत ठेविले पाहिजे. शिक्षकाचे स्वतांचें आचरण शुद्ध पाहिजे. आईबाप, शिक्षक, सोबती यांचे अनुकरण करण्याकडे मुलांची नेहमी प्रवृत्ति असते. त्यांचे जसे विचार, भावना व शील असेल त्याच प्रकारचे त्यांचे विचार, भावना व शील बहुधा होतात. संकटांत असलेला माणूस पाहून शिक्षकास जर दया उत्पन्न झाली नाही व जर ती त्याने कृतीने व्यक्त केली नाही, किंवा एखाद्याचे सत्कृत्य (--उदारपणा, पीडितांविषयी सहानुभूति, यांसारखें--) पाहून जर त्याची प्रशंसा केली नाही, तर मुलांचे मनावर काय बरें परिणाम होईल ? मुलांचे ठिकाणी साहजिकच या भावनांची वाढ होणार नाही. इतकेंच नव्हे तर त्यांचा जो काही थोडाबहुत अंश असेल तोहि नाहीसा होईल. दुसरी गोष्ट अशी की, कांहीं कांही भावनांचे स्वरूपच समजत नाही; कारण त्या इतक्या गहन असतात. तिसरे कारण असे की, एखादी कल्पना मुलांचे मनांत इतकी काही प्रबल झालेली असते, की तिचा पगडा वर्तनावर होतो--उदाहरणार्थ,- गोरगरिबांस धर्म करणे त्यांचेविषयी सहानुभूति दाखविणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य होय, अशी जरी एखादे चिक्कू माणसाची खात्री करून दिली, तरी तो आपला चिक्कूपणा