पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९९)

 विचारशक्तीचे शिक्षण व शिक्षकांचे कर्तव्यः-(१) मुलांना निर्णय बरोबर करावयास शिकवावे व नंतर (२) त्या निर्णयांवरून अनुमान कसे काढावें हे दाखवावें.
 (१) (अ) पुष्कळ वस्तूंचे निरीक्षण करवावें व भिन्न भिन्न वस्तूंतील साम्य व भेदभाव दाखवावा.
 (ब) शब्दांचे अर्थ बरोबर समजून द्यावे.
 (क) मुलांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यावीत व त्यांचा वेळोवेळी गैरसमज दूर करावा.
 (२) (अ) मुलांची जिज्ञासा तृप्त करून त्यांना चौकसपणाची संवय लावावी.
 (ब) शब्दांचा उपयोग बरोबर अर्थाने करावयास त्यांना शिकवावें.
 (क) सामान्य नियमांची व्यापकता दाखवावी. गणित, भूगोलांतील काही भाग व शास्त्रीय विषय अनुमानशक्तीचा विकास करितात. मुलांच्या वयाच्या मानानें अध्यापनाचा क्रम ठरवावा.

भाग तेरावा.
भावना.

 दुसरे भागांत सांगितलेच आहे की मुख्य मनोव्यापार तीन आहेतः-(१) बौद्धिक व्यापार, (२) सुखदुःखादि भावना आणि (३) प्रवर्तक व्यापार. येथपर्यंत बौद्धिक व्यापारासंबंधी माहिती दिली. आतां भावनांकडे वळू. भावना या नांवावरून मनाच्या काहीएक प्रकारच्या स्थितीचा बोध होतो. या स्थितीत मनावर सुखदुःखासारख्या विकृतींचा अंमल विशेष असतो. भावनांचे एकंदर तीन वर्ग मानसशास्त्रज्ञांनी केलेले आहेत, ते एणेप्रमाणे-(१) इंद्रियविकृतिज भावना, (२) मनोविकृतिज भावना, आणि (३) उच्चभावना. भूक, तहान, थकवा या इंद्रि-