पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९४)

समजल्यामुळे होते. सवय याकडे विशेष लक्ष असावें. आतां आपण शाळेत शिक्षण देतांना शिक्षकास अनुमानशक्तीस योग्य वळण कसें लावितां येण्यासारखे आहे, यासंबंधी त्याने काय काय केले पाहिजे ते पाहूं.
विचारशक्तीचे शिक्षण व तत्संबंधी शिक्षकाचे कर्तव्य.
 बौद्धिक शिक्षणाचा अंतिम हेतु मुलांना व्यवस्थेशीर विचार करण्याची संवय लावून देणे हा होय, असें पूर्वी सांगितले आहेच. विचारशक्तीस योग्य वळण लावावयाचे म्हणजे शिक्षकाने दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे (१) पहिली महत्त्वाची गोष्ट ही की, मुलांना वस्तूंविषयीं यथार्थ व स्पष्ट निर्णय करावयास शिकवावयाचें; व (२) दुसरी गोष्ट- त्यांनी जे काही पाहिले असेल अगर ऐकिलें असेल त्यांवरून योग्य त-हेने अनुमाने कशी काढावी हे दाखविणे ही होय.
 भिन्न भिन्न वस्तु मुलांसमोर ठेवून त्यांचे त्यांकडून नीट निरी- क्षण करवावें; त्यांची तुलना करावयास लावावें, व वर्गीकरणहि करावयास शिकवावें.कारण यांबरोबरच निर्णयशक्तीचे व्यापारास आरंभ होतो. मुलांनी वस्तूंचे निरीक्षण केले व त्यांची तुलना केली म्हणजे मनावर काय ठसा उमटला, काय बोध झाला, ते त्यांना शब्दांनी सांगावयास लावावें, व ती जे शब्द वापरतील ते यथार्थ आहेत किंवा नाहींत हे शिक्षकाने पाहावें. शब्द व त्यांचे अर्थ यांमध्ये ताटातूट होता कामा नये. मुलांनी पूर्वी कधीतरी जे काही पाहिले असेल अगर दुसऱ्याकडून ऐकिलें असेल त्यासंबंधी त्यांना योग्य प्रश्न करून केव्हां केव्हां पाहावे, व जर कांही त्यांची गैरसमजूत झाली असेल तर ती नाहीशी करावी. निर्णयशक्तीस शिक्षण देत असतां मुलांच्या मतांवर आपलाच अंमल एकसारखा चालवू नये. त्यांत थोडीशी तरी स्वतंत्रता त्यांस द्यावी. स्वभाववैचित्र्याकडेहि लक्ष द्यावें. जेथे जेथे म्हणून शक्य असेल तेथे तेथे आपण जे काही सांगितले असेल, त्यांतील तथ्यांश स्वानुभवाच्या साहाय्याने व