पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९०)

 (३) 'आई वाईट आहे ती मारते मला ' असें पुष्कळ मुलें म्हणतात. वरील उदाहरणांवरून मुलांचे अनुमानांत किती कोतेपणा असतो, आणि त्यांचे निरीक्षण किती अपुरें व एकदेशीय असते, हे सहज ध्यानांत येण्यासारखे आहे. काही गोष्टींत थोडेबहुत सादृश्य दिसून आले की तेवढेच बस होते. त्यावर मुलें खुशाल अनुमानें बांधितात. तसेच एखाद्या गोष्टीच्या काही विशिष्ट आकर्षक अंगाकडेसच मुलांचे लक्ष जाते; प्रत्येक गोष्टीस कारण एकच असें मुलांना वाटत असते. अर्थात् या त्यांच्या समजाप्रमाणे त्यांची अनुमाने असणार. ही वर वर्णन केलेली स्थिति साधारणपणे पांचवे सहावे वर्षापर्यंत असते. जसजसा बुद्धीचा विकास होत जातो तसतसा मुलांचे अनुमानांत फरक होऊ लागतो.
 मुलांना मुद्देसूद अनुमानें वांधितां येऊ लागली म्हणजे विचारशक्तीचा पूर्ण उदय झाला असे समजावें. सर्व माणसांचे ठिकाणी सारख्याच प्रकारची अनुमानशाक्ति दिसून येत नाही. एखादा सुशिक्षित माणूस व एखादा अडाणी कुणबी घेतला व त्या दोघांच्या मनोव्यापारांचे आपण नीट निरीक्षण केले तर या बाबींत फारच फरक दृष्टोत्पत्तीस येईल. काहींकांहीं माणसांचे ठिकाणी उद्गामी अनुमानशक्ति विशेष प्रवल असते. काहीचे ठायीं अवगामा अनुमानांचे प्राबल्य असते. सृष्टिचमत्कारांसंबंधी ज्यांनी मोठमोठाले शोध लाविले आहेत असे न्यूटनासारखे लोक पहिल्या प्रकारचे होत. युक्लीडसारखे गणिती दुसऱ्या वर्गातील होत. हा जो फरक आढळून येतो तो काही नैसर्गिक कारणांमुळे असतो व काही शिक्षण व परिस्थिति यांमुळे असतो.
 मुलांचे अनुमानशक्तीची परीक्षा करावयाची असेल तर त्यांना गणितांतील सोपी उदाहरणे घालावी; व कोणत्या प्रकारच्या चुका ती करितात, वेळ किती लागतो, हे पहावे. साधारण मोठी मुलें जर असतील तर त्यांना भूमितीतील सोपी उदाहरणे करावयास लावावी.
 अनुमानशक्तीस योग्य वळण कसे द्यावे यासंबंधी तर्कशास्त्रांत