पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९०)

पूर्वी सांगितलेच आहे की, मानसिक शक्तींचें अगर व्यापारांचें जें वर्गीकरण केलेले आहे ते केवळ सोयीकरितां होय. मनोव्यापार अगदी अलग करितां येणे कधीहि शक्य नाही. सामान्यबोध व निर्णय या व्यापारांचा जसा अगदी निकट संबंध आहे, तशाच त-हेचा संबंध निर्णय व अनुमान या व्यापारांचा आहे. निर्णयापासून अनुमानाची उत्पत्ति होते हे खरें. तरी पण निर्णयास अनुमान या व्यापाराचे थोडेबहुत साहाय्य हे लागतेच. सामान्यभावग्रहण व उद्गामी अनुमान यांमध्येहि निकट संबंध आहे. दोहोंतहि पुष्कळ निरनिराळ्या वस्तूंमधील साम्य शोधावे लागते. फरक इतकाच की, पहिल्यांत केवळ वस्तूंचाच बोध होतो व दुस-यांत वस्तूं.मर्धाल संबंधाचे ज्ञान होते. अनुमानाचा आणखीहि एक प्रकार आहे. त्यास सादृश्यानुमान असे म्हणतात. अनुमानास आधार सादृश्य असतें सबब हें नांव त्यास दिले आहे.
 सादृश्यानुमानः-दोन वस्तूंमध्ये बऱ्याचशा बाबतींत साम्य दिसून येते अशी स्थिति आहे असे समजू. पैकी एका वस्तूंसबंधी काहीएक सिद्धांत खरा ठरतो तेव्हां दुसरीसबंधीहि तोच सिद्धांत खरा ठरला पाहिजे,अशा तऱ्हेचे जे अनुमान त्यास सादृश्यानुमान हे नांव दिलेले आहे. ज्योतिषशास्त्रांत याच प्रकारच्या अनुमानांचा भरणा असतो. उदाहरणः-पृथ्वी व मंगळ या दोन्ही ग्रहांची स्थिति पुष्कळ अंशी सारखीच आहे असे आढळते. तर यावरून पृथ्वीवर ज्याप्रकारचे लोक, प्राणी व वनस्पति आहेत तसेच मंगळावर आहेत; पृथ्वीवर पाटबंधारे, रेलवे व तारायंत्रे आहेत तशीच मंगळावर आहेत;अशासारखें अनुमान सादृश्यानुमान होय. अशा त-हेचे अनुमान पुष्कळ वेळां चुकीचे ठरण्याचा फार संभव असतो. शिक्षणदृष्टया याचे फारसे महत्त्व नाही. असो; निर्णय या मनोव्यापाराचे ज्याप्रमाणे सिद्धांत हे शाब्दिक स्वरूप आहे,त्याचप्रमाणे अवगामीअनुमानाचेंहि शाब्दिक स्वरूप तर्कशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे व्यापक सिद्धांत, व्याप्य वगैरेची योग्य मांडणी करून दाखविता येते; व तर्कशास्त्रांत यासंबंधी सांगितलेल्या निय-