पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८८)

पाऊस एक घटकेत येणार ' यासारखें अनुमान बाधितो, तेव्हां प्रस्तुत व पूर्वानुभव यांतील साम्य अगोदर ध्यानात यावे लागते व यासंबंधी थोडाबहुत विचारहि करावा लागतो.
 अनुमानाचे मुख्य दोन प्रकार आहेत, ते एणेप्रमाणे:-(१)उद्गामी अनुमान व (२) अवगामी अनुमान. पुष्कळशा विशेष गोष्टींचे निरीक्षण व परीक्षण करून मिळालेल्या पुराव्यावरून जेव्हां आपण एखादा सामान्य सिद्धांत ठरवितों तेव्हा पहिल्या प्रकारचे अनुमान होते. 'मनुष्य. मरणाधीन आहे ' हा सिद्धांत आपण हा इसम मेलेला पाहातो , तो इसम मेलेला पाहातों व अशी पुष्कळ माणसें पाहातो व यासंबंधी ऐकतोंहि व नंतरच ठरवितो. देवी हा संसर्गजन्य रोग आहे' हा सिद्धांत ठरवितांना अमुक इसमास संसर्गाने हा रोग झाला, तमक्यास अशाच प्रकारे हा रोग झाला, अशा सारखी शेंकडों उदाहरणे आपणांस माहीत असावी लागतात.कोणताहि सामान्य सिद्धांत ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार केला पाहिजे. पुरावा भक्कम पाहिजे. निरीक्षण कोते असता कामा नये. शब्द व तद्ध्वनित अर्थ यांची चांगली ओळख पाहिजे; असे जर नसेल तर आपले सिद्धांत चुकीचे ठरण्याचा फार संभव असतो.
 (२) एखादा सामान्य सिद्धांत घेऊन विशेष गोष्टींना तो कसा लागू पडतो हे जेव्हा आपण दाखवितो, तेव्हां त्या मनोव्यापारास अवगामी अनुमान असे म्हणावें. या ठिकाणी विचाराची गति वरून खाली म्हणजे सामान्यापासून विशेषाकडे असते व म्हणूनच या प्रकारच्या अनुमानास अवगामी अनुमान असें नांव देण्यास हरकत दिसत नाही. उद्गामी अनुमानांत याच्या उलट प्रकार आढळून येतो, सबब त्यास तसें नांव दिले आहे. 'सर्व धातु उष्णतावाहक असतात, ' हा सामान्य सिद्धांत घेऊन, याच्या साहाय्याने जेव्हां आपण सोने, चांदी, तांबें उष्णतावाहक असलीच पाहिजेत' असा सिद्धांत ठरवितो, तेव्हां अवगामी अनुमान हा व्यापार होतो असे समजावें.
 सर्व वस्तु उष्णतेने प्रसार पावतात व थंडीने आकुंचित होतात