पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८७)

 (२) मुलांचे व अशिक्षित माणसांचे निर्णय पुष्कळ वेळा चुकीचे असतात.
 ( ३) उत्तम निर्णय नेहमी असंदिग्ध, व्यवस्थिशीर व स्वतंत्र असा असतो.
 (४) लेखन, चित्रकला, व्याकरण या विषयांत निर्णयशक्तीस बरेच शिक्षण मिळतें.

भाग बारावा.
अनुमान.

 सर्व मनोव्यापारांत अनुमान हा अत्युच्च मनोव्यापार होय. बौद्धिकशिक्षणाचा अंतिम हेतु निर्णय व अनुमान या दोन शक्तींचा पूर्ण विकास करणे हा होय. कोणताहि उच्च प्रकारचा धंदा घ्या,त्यांत याच दोन शक्तीवर बहुधा विशेष ताण पडतो. न्यायाधीश,वकील, डॉक्टर या लोकांना क्षणोक्षणी निर्णय व अनुमान या व्यापारांचा एकसारखा उपयोग करावा लागतो; म्हणूनच या लोकांचे काम डोक्याचें असें आपण म्हणतो. असो. निर्णय या व्यापारांत ज्याप्रमाणे एक कल्पना व दुसरी कल्पना यांमधील संबंध ठरविला जातो त्याचप्रमाणे अनुमानांत एक निर्णय व दुसरा निर्णय यांमधील संबंध स्थापित होतो. निर्णयास कित्येक वेळी नुसते निरीक्षण अगर स्मरण बस्स होते. परंतु अनुमान एवढयानेच होत नाही. आपले अनुभवास आलेल्या गोष्टींतील साम्य अगर संबंध शोधिल्याशिवाय अनुमान हा व्यापार होत नाही.याचे स्पष्टीकरणार्थ आपण एक दोन उदाहरणे घेऊं.'माझे समोर पडलेली वस्तु खडू आहे, अगर फळा आहे, अगर पाटी आहे, अगर पुस्तक आहे ' यांसारखे निर्णय नुसत्या अवलोकनाने अगर स्मरणाने होतात असे म्हणण्यास हरकत दिसत नाही. परंतु आकाश मेघाच्छादित पाहून, उभी वीज चमकत असलेली पाहून व हवेत एक प्रकारची चलबिचल पाहून, जेव्हा आपण