पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८६)

कळे अगर विटा घेऊन घरें, देवळे, खुर्व्या वगैरे बनविणे:- यांसारख्या व्यापारांमुळे साहजिकच निर्णयशक्तीचा विकास होतो. आपला प्रयत्न कितपत साधला आहे, यासंबंधी मुलांस विचार करावा लागतोच.
 (३) व्याकरण व वाक्यपृथकरण हे विषय शिकवितांना वाक्यरचनेशी या विषयांचा कोणता संबंध आहे, कसा आहे, हे जर मुलास दाखवून दिले व यासंबंधी जर त्यांना विचार करावयास शिकविले, तर निर्णयशक्तीचा विकास होतोच.
 (४) गणित या विषयांत तर निर्णय व अनुमान यांचाच एकसारखा संबंध येतो.
 निर्णय व अनुमान या उच्च मानसिक शक्तींस योग्य वळण लावून त्यांचा विकास करणे हे काम थोडें तसदीचे आहे. यामुळे बहुधा शिक्षकलोक स्मरणशक्तीवरच एकसारखा ताण देतात. कारण हे काम अगदीच सोपे असते. परंतु ही शिक्षणशास्त्रदृष्टया ते मोठी ढोबळ चूक करितात. मुलांस विचार करावयास लावणे हेच खऱ्या शिक्षकांचे आद्य कर्तव्य होय. पुस्तकांत जे लिहिलेले असेल त्याचा अंधाप्रमाणे स्वीकार मुलांना कधीहि करूं देऊं नये. त्यांची खात्री करून द्यावी; त्यांना विचार करावयास लावावें.

गोषवारा.

 निर्णयशक्ति- दोन सामान्य कल्पनांमधील संबंध ह्या शक्तीमुळे समजतो. वाक्य हे निर्णयाचे बाह्य स्वरूप होय.
 निर्णयाचे घटकावयव- (१) तुलना व (२) निकाल.
 निर्णयास लागणाऱ्या गोष्टीः- जरूर त्या कल्पना, चांगली निरीक्षणशक्ति व स्मरणशक्ति, अवधान एकाग्र करणे, भावनांवर योग्य दाब व शब्दांचा सांठा.

 निर्णयशक्तीची वाढ:- वाक्यांचा उपयोग, नकारयुक्त वा-क्यांचा विशेष उपयोग,तुलना,बोलतांना सावधगिरी वगैरे निर्णयशक्तीच्या विकास दर्शक गोष्टी समजाव्या.