पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६४)

तत्त्वांचा आपले कामी कसा उपयोग करितां येण्यासारखा आहे हेहि सांगितले. शेवटी मातृभाषेची अल्पसेवा करण्याची बुद्धि ज्या परमेश्वराने दिली त्याचे स्मरण करून हे लहानसें पुस्तक पुरें करितो.

गोषवारा.

प्रवर्तकशक्तीच्या उच्च शिक्षणास शाळेतील शिस्त विशेष उपयोगी पडते.
 शिस्त:- ज्यास आपण 'शिस्त' हे नांव देतों तें एक नैतिक शिक्षण देण्याचे साधन होय. 'शिस्त' या शब्दांत आज्ञाधारकपणाचा समावेश होतो. मुलांच्या अंगी खरा आज्ञाधारकपणा आणीला पाहिजे. अधिकार व आज्ञाधारकपणा यांमध्ये निकट संबंध आहे.
 शिस्तीची दोन साधने (१) शिक्षा; (२) बक्षिसें. शिक्षा करणे म्हणजे काहीतरी दुःख देणेच होय. एकंदरीत शिक्षा करणे वाईटच.
 शिक्षेसंबंधी काही नियमः-
 (१) अपराधाची पुनरावृत्ति झाली तरच शिक्षा करावी.
 (२) शिक्षा अपराधाच्या मानाने करावी.
 (३) सर्व मुलांना कधीहि एकाच वेळी शिक्षा करूं नये
 (४) निरुपायास्तव शिक्षा करावी लागते याविषयी मुलांची खात्री करावी.
 (५) नैतिक अपराधाबद्दल शिक्षा करावयाची ती एकांतांत करावी
 शिक्षेचे प्रकार:-निंदा; अपमान; बंदी; शाळेतून हाकलून देणे; शारीरिक शिक्षा; घरी काही पाठ तयार करावयास लावणे वगैरे.परिस्थितीप्रमाणे कोणती शिक्षा करावयाची तें शिक्षकाने ठरवावें.
 बक्षिसांचे प्रकारः-शाबासकी; वर्गात वरचा नंबर देणे;वर्गाचा सेक्रेटरी करणे व बक्षीस पुस्तकें देणे वगैरे.
 बक्षिसासंबंधी काही नियमः-