पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६३)

निदान झाली तरी समजून येत नाही.-- दारू पिणाराचे शरिरावर वाईट परिणाम होतो हे खरे; पण तो लवकर दिसून येत नाही. तसेच चोर चोरी करितो व त्याला काहीएक शिक्षा होत नाही; केव्हां केव्हां असे होते की, अपराध करितो एक, व त्याचे फळ भोगावे लागते दुसऱ्यास. मुलाचे अपराधाबद्दल आईबापांस दंड होतो. बक्षिसे उर्फ लांचलुचपत (एका जर्मन इन्स्पेक्टरने म्हटल्याप्रमाणे) यांचा व शिक्षेचा उपयोग आपणास करावा लागत नाही; अर्थात् आपणांवर मुलांचा राग होत नाही व मुलांना शिक्षा अन्यायाची असे वाटत नाही. कार्य व कारण यांमधील संबंध मुलांना समजू लागतो इत्यादि फायदे या प्रकारच्या शिस्तीपासून होतात; तरी पण शिक्षकानें अगर आईबापांनी या शिस्तीचा उपयोग नेहमी करणे अपायकारक होय. जेव्हां फारसा अपाय न होतां विशेष फायदा होण्याचा संभव असेल, तेव्हां या शिस्तीचा उपयोग खुशाल करावा. मुले दुर्बल असतात, अज्ञ असतात, त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य होय, ही गोष्ट नेहमी शिक्षकांनी लक्षांत बाळगावी. प्रवर्तकशक्तीचा अशा तऱ्हेनें विकास करावयाचा की, सत्कर्म करावे असे आपोआप वाटले पाहिजे, हा नैतिक शिक्षणाचा मुख्य हेतु होय. याकरितां बुद्धीचा जसजसा विकास होत जाईल तसतसें वर्तननियमांची खरी किंमत काय आहे हे मुलांस दाखवावें, व हे नियम खरोखर उपयोगी आहेत म्हणून त्याप्रमाणे वागावयाचे अशी त्यांची खात्री करून द्यावी, व हळू हळू आपला दाब अगर अंमल कमी करीत जावा. नैतिक शिक्षण नेहमी अप्रत्यक्ष तऱ्हेने दिले पाहिजे, ही गोष्ट पुन्हा एकवार येथे सांगितली पाहिजे. नीतिविषयक पाठ शिकविण्यापासून अगर उपदेश केल्यापासून मुलांचे वर्तनावर विशेष परिणाम होत नाही. तरी इतिहासांताल अगर पुराणांताल सद्गुणविषयक निवडक निवडक गोष्टींचा योग्य उपयोग केल्यास मनावर सुपरिणाम होतो, व आत्मशिक्षणास सुरवात होते. असो. येथवर मानसशास्त्राची सामान्य माहिती सांगितली, व शिक्षकांस या शास्त्रांतील