पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवन त्यांना कळले हो... त्यांना पुस्तकाचे महत्त्व उमगले! तुमच्याकडे मोबाईल, मोटारसायकल, फ्रीज, टी.व्ही., शिलाई मशीन, वॉशिंग मशीन, मिक्सर, कुकर भले नसू दे, त्यामुळे तुम्ही श्रीमंत होणार नाही. खरी श्रीमंती ती पुस्तकांची. 'एकतरी पुस्तक प्रत्येक घरी'चा संस्कार आपण आजच घेऊ या. ग्रंथोत्सवात जाऊ. पुस्तक घेऊ, साहित्यकार, कवी, कलावंतांना भेटू, बोलू ऐकू, श्रीमंती वाढवू, संस्कार, शहाणपणासाठी... एकतरी पुस्तक घरी आणू.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/२९