पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेला कळणे फार कठीण आहे. आचार्यांच्या अवताराचे महत्व काय, आपल्या श्रेष्ठ जगद्गुरूंनी कोणची कामगिरी केली, तत्पूर्वी बौद्ध जैनांच्या वेदविरुद्ध प्रवत्तीमुळे सामान्य भोळ्या वैदिक धर्मीयावर कसा विपरित परिणाम झाला होता, त्या सर्व विरुद्ध धर्ममतांचा पाडाव कसा झाला, इत्यादि अनेक मनोवेधक, हृद- यंगम, व काही प्रसंगी हृदयस्पर्शी अशा सत्यसृष्टीत घडलेल्या आपल्या धर्मगुरूंच्या गोष्टी सर्वत्रांस माहीत व्हाव्यात, याच हेतूने हा प्रयत्न केला आहे. पाखंडवादी लोकांनी केलेल्या चित्त- भ्रमाचे निरसन व्हावे, वैदिक धर्मावर आपली श्रद्धा चिरकाल टिकावी, व स्वधर्माच्या योगानें आपलें इहपरलोकींचें उत्कृष्ट साध्य साधावें हाच आचार्यांच्या अवताराचा मुख्य हेतु होता. त्याच धार्मिक मताचा प्रसार व्हावा, व सध्या चालू असलेले परधर्माचे हल्ले परतविण्याचे सामर्थ्य आमच्यांत उत्पन्न व्हावे, याच उद्देशाने हे कार्य करण्याचे ठरवून ते पुस्तकरूपाने पुढे ठेविले आहे. श्रीमदाचार्याची अनेक चरित्रं आहेत, व पुढे होतीलही. परंतु आपणही या रूपाने धर्मगुरूंची सेवा करावी, असें मनोदेवतेने सांगि- तल्यावरून हे गद्य-चरित्र, व आचार्यांच्या स्तुतिपर कांहीं पयें, व इतर कांहीं देवांचीं पदें या पुस्तकांत घातली आहेत. मी विनंति केल्यावरून आचार्यकुलाचे सन्मान्य विद्वान् संस्थापक वे. शा. सं. विष्णुशास्त्री बापट यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून मला योग्य त्या सांप्रदायिक सूचना दिल्या, याबद्दल मी त्यांचे मनः- पूर्वक आभार मानतो. तसेंच माझे मित्र रा. रा. शंकर दत्तात्रय रबडे, बी. ए., यांनी या ग्रंथास उत्तम प्रस्तावना लिहून दिली याबद्दल त्यांचाही मी फार ऋणी आहे. श्रीविद्यारण्यांचा शंकरदिग्विजय ग्रंथ शोधण्याचे कामी, माझे सहकारी मित्र'