पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखकाचें मनोनिवेदन. जन्मादारभ्य व कैलासगमनापर्यंत ज्याने आपले आयुष्य अखिल जगाच्या उद्धाराप्रीत्यर्थ खर्च केलें, व अपौरुषेय अशा वैदिक धर्माचें पुनरुज्जीवन करण्याकरतांच अवतारकार्य दर्शविलें, त्या यति सम्राट् आद्य श्रीशंकराचार्याचें चरित्र आज वैशाख श्रु।५ आचार्य जयंतीच्या शुभप्रसंगी प्रसिद्ध करण्याचा योग येत आहे,याबद्दल आनंद वाटतो. वाङ्मयसेवेच्या रूपाने साहित्यक्षेत्रामध्ये मी प्रथमच प्रवेश करीत आहे. तो प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याबद्दल माझें मन संशयांत आंदोलन करीत आहे. अनधिकारी व्यक्तीने नवीनच प्रयत्न केल्यास, होणाऱ्या पुस्तकांतील अधिकोत्तर प्रमादास्तव जनते- कडून मिळणारे आघात सहन केलेच पाहिजेत. आपला दोष आपणास कधीच दिसणार नाही. लोकांच्या दृष्टीसमोर आले असतां आपल्या चुका सुधारून पुढे व्यवस्थित मार्ग तरी सांपडेल, या सद्धेतूने हे अल्पसें चरित्र लिहून जनतेपुढे अभिप्रायार्थ सादर करीत आहे. हा सद्धेतु मनांत बाळगून, प्रज्ञावान् वाचकांकडून माझ्या पहि- ल्याच अल्प कृतीचा अव्हर न व्हावा अशी विनंति आहे. . ज्या महाभाग पुण्यश्लोक आद्य श्रीशंकराचार्यांच्या अत्यंत परिश्रमाने हा सनातन वैदिक धर्म आजवर टिकून राहिला, त्या श्रीमदाचार्याचे महाराष्ट्रभाषेत सामान्य स्त्री, पुरुष व बालवाचकां- करितां एक चरित्र लिहावे असा बरेच दिवसाचा मानस होता. तो सुदिन आज श्रीआचार्यांचे कृपेनें प्राप्त झाला आहे. आचार्याची मराठी भाषेत फारच थोडी चरित्रे लिहिली गेली. संस्कृत भाषेत चरित्रपर पुष्कळ ग्रंथ आहेत. परंतु ते ग्रंथ प्राकृत सामान्य जन-