पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रा. रा. गोविंद नरहर पंढरपुरे, यांनी मला फार मदत केली. त्यांच्या स्वार्थनिरपेक्ष मदतीबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. त्याचप्रमाणे या ग्रंथांतील पद्यांच्या चाली उत्तम त-हेने बसवून दिल्याबद्दल चिंचवड येथील प्रसिद्ध गवई रा. रा. दत्तात्रय विष्णु पालकरबुवा यांचाहि मी फार आभारी आहे. शेवटी सत्यान्वेषण करणाऱ्या विद्वान् वाचकांस नम्र विनंति करितों की, हंसक्षीरन्यायाने या छोट्या पुस्तकांतील उपयुक्त भाग असेल तो व्या व कमी अधिक, शुद्धाशुद्ध, असंबद्ध व अप्रासंगिक असे जे काही दोष घडले असतील त्याबद्दल क्षमा करा, अशी सविनय प्रार्थना करून हे मनोनिवेदन पुरे करतो. श्रीक्षेत्र चिंचवड, ) वैदिक धर्मानुयायी, वैशाख श्रु। ५ वासुदेव विष्णु कवि. शके १८५३.