पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३) राज्य असल्याने त्यांना या धर्माविषयी कळकळ कितीशी अस- णार है दिसतेच आहे! आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या शंकराचार्यांच्या गादीवर असलेल्या जगद्गुरूच्या हाती सरकारने मुळीच सत्ता ठेवली नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे कोणाचा मेळ कोणास राहिला नाही, अशी शोचनीय स्थिती प्राप्त झाली आहे. अशा वेळी श्रीशंकराचार्यांचे चरित्र प्रसिद्ध होत आहे ही गोष्ट त्यांतल्या त्यांत समाधानाची आहे. श्रीशंकरा- चार्यांचे चरित्र व त्यांचे भाप्य वगैरे ग्रंथ अज्ञानांधकारांत चांच- पडत असलेल्या अज्ञ जीवांस, समुद्रांत मार्ग चकलेल्या नावा- ड्यास ज्याप्रमाणे उत्तरध्रुव मार्गदर्शक होतो, त्याप्रमाणे मार्गदर्शक होतील असा मला भरंवसा आहे. प्रस्तुत लेखकाने या चरित्रास प्रस्तावना लिहिण्यास सांगून मला आचार्याची, अल्पशी कां होईना, पण सेवा करण्याची सुसंधी लाभून दिली,याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानून ही प्रस्तावना पुरी करतो. शंकर दत्तात्रेय रबडे, . बी. ए.