पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) करून सोडणारें महादुर्घट काम केले आहे. त्यांचे विलक्षण बुद्धि- सामर्थ्य, सरस्वतीसही जिंकणारें अप्रतिम वक्तृत्व व वाक्पटुत्व, तसेंच कडकडीत वैराग्य, या व अशाच इतर गोष्टी चरित्रामध्ये सहज प्रामुख्याने दिसतात. त्यांचे चरित्र वाचीत असतांना वाच- कांचे मन साहजिकच त्यांत रमून जाते व क्षणभर का होईना, पण त्यास बाह्य जगाचे विस्मरण होते. नास्तिक लोकांस अर्था- तच या अलोट बुद्धिसामर्थ्याचे व वैराग्याचे वर्णन पटणार नाही. पण ज्यांचे समाधान प्रत्यक्ष ब्रह्मदेवासही करता येणार नाही, अशा नास्तिक ब पाखाडी लोकाकरतां हे चरित्र लिहिले नसून भाविक अंतःकरणाच्या लोकांकरतांच लिहिलेले आहे. शंकराचार्य हे परम मातृभक्त होते, इतर व्यवसायांत ते आपल्या मातेस विस- रले नाहीत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते अद्वैतवादी अस- ल्याने कित्येकांचा त्यांस विरोध होता. परंतु द्वैत ही अद्वैतांत जाण्याची पायरी असल्याने वास्तविक हा विरोध नव्हता. अज्ञ जनांकरतां द्रुतमार्ग असून अद्वैतमार्ग हा महाबुद्धिमान् योग्या- करतां आहे. एकाच साध्याकरतां हे भिन्न मार्ग आहेत. अज्ञाची प्रज्ञावानामध्ये परिणति झाली म्हणजेच परब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते. शंकराचार्यांचे चरित्र वाचीत असतांना वाचकांस श्रीज्ञाने- श्वरांची आठवण झाल्यावांचून राहात नाही. दोघेही महाबुद्धि- वान्, अल्पायुषी व वैराग्यसंपन्न होते. शंकराचार्यांनी उपनिषदावर संस्कृत भाष्य लिहिले, तर ज्ञानश्वरांनी श्रीमद्भगवद्गीतेवर प्राकृत टीका लिहिली. या दृष्टीने आर्यावर्ताइतका संपन्न व भाग्यवान् देश अखिल भूतलावर अन्यत्र सांपडणार नाही. ___ सांप्रत वैदिकधर्मास जें शैथिल्य प्राप्त झाले आहे त्याचे कारण या धर्मास कोणीही शास्ता नाही हेच होय. परधर्मीयांचे