पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रह्म सत्य मिथ्या है जगत । वैदिक हा निश्चित् सिद्धांत तत्व मान्य जगतांत कराया। निघती विजयाला ॥३॥ कर्मठ मंडन पंडित मोठा । हटवादी अभिमानी खोटा वाद करुनि त्या शिष्य बनविलें । थोर विजय झाला ॥४॥ दशोपनिषदें वेदावरतीं। दिव्य भाष्य करि अद्भुत जगती । अगाध प्रतिभेने जग दिपलें । अमर ग्रंथमाला ॥ ५॥ चतुर्दिशेला मठ स्थापुनी ! प्रमुख चार शिष्यांसी ठेवुनि । एकछत्रि अद्वैत मताने । भारत भूषविला ॥६॥ देवि शारदा काश्मिरवाली । परम श्रेष्ठ पद आचार्यासी। सर्वज्ञत्वा मोदें अपी। त्रिभुवन जेत्याला || ७॥ पार्वतीश परमेश्वर आले । शंकर देशिकरूपें नटले। विमल कीर्तिध्वज फडके भूवरि । मोद होय सकलां ॥८॥ ज्यांच्या पुण्ये धर्म सनातन । वैदिक तरला होय चिरंतन । जगद्गुरूंच्या चरणीं नमवी । कविसुत शीर्षाला ॥९॥ देवांची विविध पदें पद्य १ लें. गणेशस्तवन ( राग-देस ताल-त्रिवट) श्रीमोरयास स्मर मनिं सदाच । कार दुरित नाश । नच भ्रम मनास । सुररत दिनास । नेई निजपदास ॥धृ०॥ कलियुगि तारक नाम प्रभूचें । अन्य न साधन स्वल्प सुखाचें। कलियुगांत । कवि गाइ सदा श्रीप्रभुवरास ॥१॥