पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५०) हिमालयावरि बदरिकाश्रमीं पुनरपि ते आले. देवकार्य संपतां ब्रह्मचिंतनास ते बसले ब्रह्मैद्रादिक देव तयासी सामोरे आले आचार्यासी कल्पवृक्षिच्या पुष्पांनी पुजिले थोर सोहळा अनुपम तेथे कैलासी झाला आचायांच्या पुढे अकस्मात् नंदि उभा ठेला इष्ट कार्यपूर्ती ती होतां सस्मित वदनाने आरोहण आचार्ये करिता नंदि डुले माने पंचवदन भाळि तो चंद्रमा करीं त्रिशूल असे व्याघ्रचर्म नीलकंठ शीर्षी श्रीगंगा विलसे रूप प्रगट दावुनी मनोहर कैलासी जाती सुरवर किन्नर जयध्वनी करि गुप्त तदा होती त्या आचार्याच्या चरणीं भाकितो कृपा दिनरजनी सन्मति द्या तव गुणकथनी शिष्य विष्णुसुत वासुदेव कवि नमनासी करितों आद्य शंकराचार्याच्या मी यशचरिता गातो ॥ध्रु०॥ श्रीशंकराचार्यस्तवन (चाल-श्रीनारायणरावासी.) हा धर्म सनातन वैदिक भूवरि दिग्विजयी झाला ॥ध्रु०॥ मतामतांची दोषिक रजनी । पूर्ण जाहली भारतभुवनीं । आद्य जगद्गुरु येतां उद्या । द्वैतभ्रम गेला ॥१॥ पंचम वर्षी उपनयनादिक । अष्टवरी वेदाध्ययनादिक ॥ षोडशामधे करि भाष्याला । विस्मय जगताला ॥२॥.