पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४९) आचार्य व्यथित ते झाले सच्छिष्या है ना रुचलें उलटवितां मंत्र मांत्रिकावरि रोग दूर होतो ॥ ध्रु० ॥ -५- भाष्य पाहुनी गौडपादमुनि प्रमुदित बहु झाले आत्मचितनाचा वर देउनि गुप्त तदा झाले काश्मिर देशी असे शारदा मंदिर अतिख्यात चतुज़रें चार दिशेला पीठ एक आंत पूर्वोत्तर पश्चिम द्वारेही उघडिति सर्वज्ञ दक्षिण बाजू बंद सदा ती दाक्षिणात्य अज्ञ वार्ता ऐशी आचार्यासी कळतां ते निघती दाक्षिणात्य अज्ञ या प्रवादा निरसनार्थ जाती तेथे येतां कणाद गौतम नैय्यायिक आले बौद्ध, जैन, कापालिक, जैमिनि हटवादी लढले निर्वाणीचा वाद भयंकर शेवटचा ठरला निकरें आचार्य वाद करिती विजय पूर्ण झाला दक्षिण द्वारा उघडुनि पंडित मान्य मार्ग देती मंदिरांत आचार्य जाउनी देवीसी नमिती ते सरस्वती मग बोले योग्य त्या उत्तरा दिधलें पीठावरि आरुढ झाले देव सुमे वर्षिती नभांतुनि जयध्वनी घुमतो ॥ ध्रु० ॥ --- बदरिकाश्रमी जगन्नाथ द्वारका शूगिरीसी चतुर्दिशेला मठ स्थापुनी ठेविति शिष्यांसी