पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४७) मातेने मत देतां नळे पाय सोडला तो ॥ध्रु० ॥ -२- मातेच्या संरक्षणकाी बांधव ठेवियले मातृपदा वंदन करुनी ते गुरुधामी आले नमन करुनि गोविंद गुरूसी केला संन्यास पूर्ववृत्त स्वर्गिचे सांगती गुरुजी शिष्यास शिष्य होउनी भाष्य तूं करशिल रे खास अद्वैताचा प्रसार करण्या जा तूं काशीस काशिक्षेत्रीं येउनि यात्रा केली संपूर्ण शिष्य सनंदन नाम पुढति त्या पद्मपाद जाण चित्सुख आनंदादिक शिष्यां शानदान देती वृद्धशिष्य गुरुजी युव दिसती जगा पडे भ्रांती चांडाळाच्या वेषं देवें ज्ञानामृत दिधलें शंकररूपें दर्शन देउनि इष्टकार्य कथिले व्यासांनी दर्शन दिधले वादासी स्थळ दर्शविले पांडित्य प्रमुदित झाले मत अद्वैता भट्ट कुमारिल अनुमति दर्शवितो ॥ ध्रु० ॥ -३- कर्मवादि कर्मठ पंडित तो मंडनमिश्र वसे कर्ममार्ग दासी शुक त्याच्या वदती भाग्य असे संन्यासाचा द्वेष्टा मोठा वादी विद्वान महेश्वरी आचार्य त्यासी दिधले आव्हान सरस्वती मध्यस्थ बनविली मंडनपत्नी ती सरस्वती वाग्देवि खरोखर आली भूवरती -