पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४६) शिवगुरुची पत्नी आर्याबा तिज उदरीं आले शंकररूपें शिव जन्मुनियां कौतुक दर्शविले हा धर्मभानु अवतरला घनअंधकार घालविला परमोच्च कार्यि हा रतला शिवगुरु अपुल्या शंकर ऐसें नांव मुला देतो आद्य शंकराचार्याच्या मी यशचरिता गातों ॥ ध्रु० ॥ प्रथम वर्षि आचार्य स्वभाषा बोलति अल्पवयी द्वितीय वर्षी कथापुराणादिक श्रवणा जाई दुर्दैवाने तिसरे वर्षी शिवगुरु मृत झाले आर्याबेसह आचायांचे चित्त तदा पोळे त्या समयाते प्रतिभाशक्ती उदयात आली अनुपम सर्वज्ञता निसर्गं तदा तया झाली पंचम वर्षी गुरुने त्यांच्या उपनयना केले वेदचतुष्टय सांग सार्थ गुरुजीने शिकवीलें अष्टवर्षपर्यंत प्रवचन वेदावरि केले निर्धन विप्रस्त्रीगृह सुवर्ण आमलके भरले मातेची सेवा करतांना गंगामातेला गृहाजवळि आणिती भक्तिने देवहि वश त्याला आचार्याशी राजशेखरे नाटयग्रंथ दिधले तनय सुखाचा वर त्या देउनि प्रमुदित हो केले नक्राने चरणा धरिलें आचार्य आइसी वदले संन्यासा मत दे पहिले